नुकतेच जपानमध्ये किनारपट्टीला लागून असणार्या एका शहरातून आभाळाकडे पाहिले असता रहस्यमयरीत्या चमकणारे 9 खांब दिसले. आभाळात दिसणारे हे दृश्य पाहून स्थानिक लोक हैराण झाले. नेमकं घडतंय काय, हेच त्यांना कळत नव्हतं. सध्या सोशल मीडियावर जपानमधील हेच फोटो व्हायरल होत असून, माशी नावाच्या एका स्थानिक व्यक्तीनं घडल्या प्रकारासंदर्भात माहिती दिली. अर्थात, नंतर या प्रकाशाचे गूढही उकलले ! घरातून बाहेर पडताच त्याने …
Read More »डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या बालपणीची एक हृदयस्पर्शी आठवण
मी लहान होतो तेव्हाची गोष्ट. प्रत्येक आईप्रमाणेच माझी आई आम्हा सर्वांसाठी जेवण तयार करायची. दिवसभर कष्टाची कामे करून आई खुप दमून जायची. एके रात्री आईने स्वयंपाक केला आणि माझ्या बाबांना जेवायला वाढले. त्यांच्या ताटात एक भाजी आणि एका बाजूने पुर्णपणे करपलेली भाकरी दिली. त्या जळालेल्या, करपलेल्या भाकरीबद्दल कोणी काही बोलतेय का याची मी वाट पहात होतो. परंतू बाबांनी आपले जेवन …
Read More »बंडखोरीला खतपाणी
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांचा निकाल अलीकडे जाहीर झाला. जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनी तर 2019 मध्ये कलम 370 हटविल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणूक झाली. तत्कालीन मोदी सरकारच्या या निर्णयामुळे विकासाच्या मार्गावर जम्मू आणि काश्मीर सुसाट वेगाने पळेल, असेच चित्र निर्माण झाले. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला भरभरून मते मिळतील, असा अनेकांचा होरा होता. प्रत्यक्षात मात्र भाजपला बहुमताच्या आसपास जातील एवढ्याही …
Read More »दाढीपुराण
दाढी ही निसर्गाने पुरुषाला दिलेली अशी भेट आहे, जी काहीजणांना हवीशी वाटते तर काहींना नकोशी. गंमत म्हणजे, दाढी आणि मिशी फक्त पुरुषांना लाभलेली असली, तरी मराठीत हे दोन्ही शब्द स्त्रीलिंगी आहेत. दाढीचा संबंध कधी धर्माशी जोडला जातो, कधी परंपरेशी तर कधी चेहर्याच्या उठावदारपणाशी. प्राचीन ऋषीमुनींच्या दाढीपासून आजच्या कॉर्पोरेट दाढीपर्यंत एक मोठी परंपरा पाहायला मिळते. अलीकडे दाढी वाढवण्याचा आणि तिला वेगवेगळे …
Read More »तिरंग्याला 21 वेळा वंदन करण्याची शिक्षा
भोपाळ येथील एका आरोपीने ‘भारतमाता की जय’ म्हणत तिरंग्याला 21 वेळा वंदन केले आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आरोपीला ही शिक्षा सुनावली होती. या आरोपीने पाकिस्तान समर्थनपर घोषणा दिल्या होत्या. हा आरोपी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मंगळवारी पोलिस ठाण्यात हजर होऊन ‘भारतमाता की जय’ म्हणाला. त्याने तिरंग्याला 21 वेळा वंदन केले. विशेष म्हणजे जामिनावर मुक्तता मिळण्यासाठी या अटीचे पालन …
Read More »याला ‘आजार’ ऐसे नाव?
मथळा वाचून तुम्हाला एखादा गंभीर आजार किंवा रोगाविषयी लेख असेल, असे वाटू शकते. मात्र इथेच तुमची गल्लत होऊ शकते. अलीकडेच उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी एका ठिकाणी बोलताना देशाबाहेर जाण्याचा तरुणांना ‘आजार’ झाला असल्याचे मत मांडले. अर्थात तरुणाई देशाबाहेर का जात आहे? कशामुळे देश सोडण्याची वेळ आली ? यामागची प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतात. श्रीमंत देश वगळली तर सर्वच विकसनशील देशात …
Read More »बालविवाहांचे कटू वास्तव
नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी 2022 मध्ये बालविवाह मुक्त भारत आंदोलनाची सुरुवात केली होती. या आंदोलनाचा उद्देश 2030 पर्यंत देशातून बालविवाहाचे उच्चाटन करणे हा होता. पण आजही कोठे ना कोठे धर्माच्या, प्रथेच्या पडद्याआड बालविवाह होण्याचे प्रमाण पाहता हे लक्ष्य गाठणे कठीण वाटत आहे. ‘युनिसेफ’च्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 18 वर्षापेक्षा कमी वयोगयातील सुमारे पंधरा लाख मुलींचे विवाह होतात आणि भारत …
Read More »अलाया झळकणार सिक्वेलपटात
अलाया एफने पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या आहेत आणि तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या अभिनेत्रीने ’जवानी जानेमन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि ’फ्रेडी’, ’बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ’शीकांत’ सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला. आलियाच्या पुढील चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटवर एक मोठे अपडेट समोर आले आहे. ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटाच्या …
Read More »‘लापता लेडिज’ ऑस्कर मिळवेल?
चित्रपटसृष्टीत काम करणार्या प्रत्येक कलाकारांचे ऑस्करची बाहुली मिळवण्याचे स्वप्न असते. कोडॅकच्या स्टुडिओत आयोजित भव्य दिव्य सोहळ्यात ‘ऑस्कर गोज टू… हे शब्द ऐकताना अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकतात. भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश असला तरी ऑस्कर पुरस्कार विजयाचे सुख फारसे पदरात पडलेले नाही. यावर्षी आमीरखान आणि किरण राव यांचा बहुचर्चित ‘लापता लेडीज’ चित्रपट भारताकडून ऑस्कर सोहळ्यासाठी पाठविला जाणार आहे. या …
Read More »अभ्यास अन नोकरीचा मेळ बसवताना…
शिक्षणाबरोबरच नोकरी करण्याचे कौशल्य सर्वानाच जमते असे नाही. नोकरी आणि अभ्यास याचा ताळमेळ साधनाता अनेकांचा गोंधळ उडतो. परंतु या दोन्ही बाबी करणे शक्य आहेत. नोकरी आणि शिक्षण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्या योग्य रितीने हाताळू शकतो. बहुतांशी विद्यार्थी विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अर्धवेळ नोकरीसाठी प्राधान्य देतात. याचा पहिला फायदा असा की आपले अर्थाजन सुरू होते. अर्धवेळ …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र