लेख-समिक्षण

ज्ञान-विज्ञान

आरोग्यवर्धक ‘लाल सोने ’

जगातील सर्वात महागडा मसाला म्हणजे केशर. इराणमधून अतिशय चांगल्या दर्जाचे केशर जगभर निर्यात केले जात असते. आपल्याकडे काश्मीरमध्येही केशराची शेती होते. हे ‘लाल सोने’ स्वाद व सुगंधासोबतच आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक असते. आहारात केशरचा नियमित समावेश केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. केशरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते, असे …

Read More »

प्राण्यांचे आयुर्मान वेगळे का?

प्रत्येक प्राण्याचे किंवा प्रजातीचे आयुर्मान वेगवेगळे असते. ते तसे का असते याबाबत संशोधकांना कुतूहल वाटत होते. याचे कोडे डार्विनच्या काळापासून उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञांना सापडलेले नाही, पण आता एका नव्या प्रारूपानुसार कुठल्याही सजीवाच्या प्रजातीचे आयुर्मान हे उत्क्रांतीतील बदलांशी व त्यातून निर्माण होणार्‍या दडपणांशी संबंधित असते, असे आढळले आहे. या संशोधनाचा लाभ मानवातील वृद्धत्वाच्या प्रक्रियेचा वेग कमी करणारी तंत्रे व औषधांचा शोध लावण्यासाठी …

Read More »

लॉकडाऊनचा परिणाम चंद्रावरही!

कोरोना महामारीच्या काळात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन होते. त्याचा हवामान, पर्यावरणासाठी बराचसा अनुकूल परिणामही झाला होता. हवा आणि नद्या शुद्ध झाल्याची अनेक उदाहरणे त्यानंतरच्या काळात समोर आली होती. मात्र पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्रावरही या लॉकडाऊनचा परिणाम झाला असेल याची आपण कल्पनाही करणार नाही. आता संशोधकांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात चंद्राचे तापमानही सामान्य तापमानापेक्षा कमी झाले होते! लॉकडाऊन काळात …

Read More »

जगावेगळी कॉफी

चहाप्रमाणेच जगभरात कॉफीप्रेमींची कमतरता नाही. अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीच्या वाफाळलेल्या कपाने करतात. त्याचा सुगंध कॉफी पिणार्‍यांना वेड लावतो. एखाद्याला कॉफी पिण्याची सवय लागली तर तो त्याची वेगवेगळी चव ट्राय करतो. त्याच्या वेगवेगळ्या बीन्सची चव वेगवेगळी असते. जगातील सर्वात चविष्ट कॉफी इतकी महाग आहे की त्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतात. या वेगवेगळ्या कॉफीची चव तुम्हाला नक्कीच आवडेल, पण …

Read More »

माणसांप्रमाणे प्राण्यांनादेखील पडतात स्वप्ने!

स्वप्न पडणे ही सामान्य गोष्ट आहे. जवळपास प्रत्येक मनुष्याला हा अनुभव येतो. पण माणसाप्रमाणे प्राण्यांनादेखील स्वप्न पडतात, असे संशोधनातून समोर आले आहे. अनेक महान तत्त्वज्ञानी, शास्त्रज्ञांनीदेखील यावर भाष्य केले आहे. प्राण्यांना स्वप्न कसे पडते, स्वप्न पडताना त्यांच्या शारीरिक हालचाली कशा असतात आणि याबाबत विज्ञान काय सांगते, ते लक्षवेधी आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेले संशोधन आणि जगभरात झालेल्या वेगवेगळ्या अभ्यासात प्राण्यांना …

Read More »

स्वप्नांचं रेकॉर्डिंग

स्वप्नांबाबत प्राचीन काळापासूनच माणसाला कुतूहल वाटत आलेले आहे. आपल्याकडे उपनिषदांत ज्या तीन अवस्थांमधून आपण जातो, त्यामध्ये जागृती, स्वप्न व सुषुप्ती (स्वप्नरहीत गाढ झोप) यांचा समावेश केलेला आहे. स्वप्नाबाबत आधुनिक काळातही अनेक प्रकारची संशोधने झाली आहेत. अनेकजण रात्री पाहिलेले स्वप्न विसरून जातात. परंतु, स्वप्न विसरण्यास आता बाय बाय करता येणार आहे. तुम्ही पाहिलेले स्वप्न रेकॉर्ड होणार आहे. मग सकाळी उठून स्वप्न …

Read More »

ऑफिस स्ट्रेस टाळण्यासाठी

सध्याच्या व्यस्ततेच्या जीवनात अनेक लोकांवर कामाचा ताण सतत वाढतोय. या वाढत्या कामाच्या दबावामुळे अनेकांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतोय. अधिक ताण आणि दडपण केवळ आपल्या कामावर परिणाम करत नाही, तर आपल्या आरोग्यावरही याचे गंभीर परिणाम दिसू लागतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. हा ताण टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. एका अहवालानुसार, जास्त कामाचा ताण चिंता, नैराश्य आणि …

Read More »

क्यूआर कोड प्रणालीच्या अंतरंगात

आजकाल ठेला लावलेल्या भाजीवाल्यापासून ते पानपट्टी चालवणार्‍या दुकानदारापर्यंत सर्वच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट स्वीकारली जाते. एक वेळ अशी होती की, क्वचितच कोणी ऑनलाईन पेमेंट वापरायचे. शिवाय मोठ्या व्यवहारासाठी ऑनलाइन पेमेंट वापरले जायचे. पण आता अगदी एक रुपयाचे ऑनलाईन व्यवहारदेखील केले जाऊ शकते. पण आता यासंदर्भात असा प्रश्न उपस्थित झाला की, सर्व क्यूआर कोड सारखेच दिसतात, असे जगात लाखो प्रकारचे क्यूआर कोड …

Read More »

बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढला

जगभरात सध्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढत असल्याचे दिसून आले आहे. एवढंच नव्हे तर याच्या उपचाराकरिता वापरली जाणारी औषधे प्रभावहिन होत असल्याचे संशोधनात आढळले आहे. या चोरपावलांनी पसरत असलेल्या धोक्याची वेळीच दखल घेणे गरजेचे असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठातील आण्विक जीवशास्त्रज्ञ नॉर्मन व्हॅन रिजन यांच्या मते, जागतिक आरोग्य चर्चांमध्ये बुरशीजन्य रोगजनक आणि अँटिफंगल प्रतिरोधकतेच्या धोक्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. …

Read More »

जनुकात अचूक बदल शक्य

जगभरात जीन्स म्हणजेच जनुकांबाबतही वेगवेगळे संशोधन होत असते. जनुक संपादनातील प्रकाशाचा वापर करण्याची एक वेगळी पद्धतही वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. त्यामध्ये जनुकांचे संपादन अधिक अचूक पद्धतीने करता येते. पेशीतील जनुके नियंत्रित करण्याचा हा प्रभावी उपाय सापडला असल्याचे अमेरिकेतील पीटसबर्ग विद्यापीठातील संशोधक अ‍ॅलेक्झांडर डेटर्स यांनी म्हटलेले आहे. या नवीन पद्धतीमुळे जनुकाचे पेशीतील स्थान व वेळ ठरवता येते. त्यामुळे एखादा जनुक अचूकतेने …

Read More »