आपल्याकडे आता अनेक नव्या वाटणार्या भाज्याही रूळू लागल्या आहेत. कोथिंबिरीसारखी दिसणारी पार्ली असो किंवा फ्लॉवरसारखी दिसणारी ब्रोकोली, यूट्यूब – टीव्हीवरच्या रेसिपी शोमुळे त्यांची ओळख सर्वांनाच झाली. ब्रोकोली आणि फ्लॉवर या दोन भाज्या एक सारख्याच दिसत असल्याने खरेदी करताना कोणती भाजी जास्त आरोग्यदायी आहे हे कळत नाही. आता याबाबत आहारतज्ज्ञांनी काही माहिती शेअर केली आहे. ब्रोकोली आणि फ्लॉवरमध्ये काय फरक आहे? …
Read More »ज्ञान-विज्ञान
झोपताना एक डोळा उघडा का ठेवते मगर?
मगरीला ‘हँगमन ऑफ वॉटर’ म्हणतात. तिच्या परिसरात मोठमोठे प्राणी सापडल्यानंतर ती त्यांची अशा भयानक पद्धतीने शिकार करते की, तिला पाहून जीवाचा थरथराट होईल. सर्वप्रथम ती भक्ष्याला तिच्या जबड्यात पकडते. यानंतर ती अनेक वेळा आपले शरीर 360 अंश वळवते. यामुळे शिकार केलेल्या प्राण्याच्या हाडांचा चक्काचूर होतो. त्यानंतर ती आपली शिकार भक्षण करते. मगर काही वेळा सिंह व बिबट्यासारख्या प्राण्यांचीही शिकार करते. …
Read More »फळमाशांचाही मेंदू असतो तल्लख!
मानवाचा मेंदू म्हणजे निसर्गाची सर्वात थक्क करणारी करामत आहे. मानवाने बुद्धीच्या जोरावरच जगात आपले सामाज्य बनवलेले आहे. मात्र मानवाशिवायही अनेक जीवांमध्ये त्यांचे जीवनयापन करण्यासाठी योग्य अशी बुद्धी असते. जी फळमाशी फळांना सडवते, तिच्याकडे नसती आफत म्हणून आपण पाहात असलो तरी ती फार चतुर असते व तिचा मेंदूही तल्लख असतो. कुठलीही कृती करण्यापूर्वी फळमाशी विचार करते, असे ऑक्सफर्डच्या संशोधकांनी म्हटले आहे. …
Read More »जास्वंदाच्या चहाचे आरोग्यलाभ
जास्वंदाला इंग्रजीत ‘हिबिस्कस’ या नावाने ओळखले जाते. जास्वंद ही आशिया खंडात आढळणारी सदारहरित वनस्पती आहे. भारतात कित्येक वर्षांपासून जास्वंदाच्या फुलांचा वापर पूजा आणि विधींसाठी केला जातो. जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या सुकवून त्यांचा नैसर्गिक रंग म्हणून वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, बाप्पांच्या आवडत्या जास्वंदाचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. विशेषतः जास्वंदाचा चहाही आरोग्यासाठी गुणकारी असतो. जास्वंदाचा चहा किंवा जास्वंदाचा अर्क …
Read More »अबब! 33 कोटींचं पत्र
जक्षाला सापेक्षतावादाचा सिद्धांत देणारे महान संशोधक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी लिहिलेल्या एका पत्राचा नुकताच लिलाव करण्यात आला. या पत्राला तब्बल 33 कोटी रुपये किंमत मिळाली आहे. या पत्रात शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांनी काही वैज्ञानिक इशारे पुन्हा एकदा जगासमोर आणले होते. 1939 साली आईनस्टाईन यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती फ्रँकलिन डी रुजवेल्ट यांना लिहिले होते. यात त्यांनी अणुबॉम्ब आणि त्याचा शस्त्र म्हणून होणारा वापर याबाबत …
Read More »जितके भूकंप, तितके जमिनीत सोने
सर्वांत विध्वंसक नैसर्गिक आपत्तींमध्ये भूकंपाचा समावेश होतो. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. त्यामुळे भूकंप होणे अर्थातच कोणालाही नको असते; मात्र याच भूकंपामुळे सोन्याची निर्मिती होते, हे फार कमी जणांना माहिती असेल. शास्त्रज्ञांनी याबाबत मोठा शोध लावला आहे. भूकंपामुळे क्वार्टझ्? (सिलिकॉन डायऑक्साईडपासून तयार झालेलं खनिज) क्वार्ट्झमधून जाणार्या फ्रॅक्चर लाइन्समध्ये सोन्याचे गोळे तयार होतात, असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे. क्वार्टझ् …
Read More »वार्धक्य रोखायचंय?
वार्धक्य रोखण्याबाबत सतत नवनवे संशोधन होत असते. आहारातील बदलही यासाठी उपयुक्त ठरत असतात. कमी कर्बोदके व कमी उष्मांक असलेला आहार हा वार्धक्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करतो. कारण त्यात विशिष्ट प्रकारचे संयुग असते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. ग्लॅडस्टोन प्रयोगशाळेतील संशोधक एरिक वेर्दिन यांनी सांगितले की, मानवी शरीरातील एक संयुग हे वार्धक्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. वयाशी निगडित असलेले हृदयरोग, …
Read More »सर्वात पातळ काच!
जगातील सर्वात पातळ काच कुठे शोधण्यात आली हे तुम्हाला माहिती आहे का? अपघातानेच हा शोध लागला होता व या काचेची जाडी दोन अणूंइतकी आहे. कॉर्नेल व जर्मनीच्या उल्म विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधलेली काच ही सर्वात पातळ काच म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंदली गेली आहे. या काचेचे तावदान इतके पातळ आहे, की त्याचे सिलिकॉन व ऑक्सिजन रेणू हे इलेक्ट्रॉन …
Read More »चंद्रावरील खडकांत पुरावे
प्राचीन काळात पृथ्वीचे वातावरण कसे होते, याचे सर्वात जुने पुरावे हे पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्रावरील खडकांमध्ये दडलेले आहेत. एका नव्या संशोधनातून ही माहिती समोर आली. नासाच्या अपोलो मोहिमेत चांद्रभूमीवरून आणलेल्या खडकांच्या अभ्यासातून ही बाब स्पष्ट झाली. 50 वर्षांपूर्वी हे खडकांचे नमुने अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनी पृथ्वीवर आणले होते. या खडकांमध्ये चुंबकीय गुणधर्मही अडकलेले आहेत. एके काळी पृथ्वीप्रमाणेच चंद्रालाही स्वतःचे …
Read More »हिरे निर्मितीसाठी जगावेगळा मार्ग
गायीची ढेकर किंवा पोटातून निघणार्या वायूपासून हिरे बनवले जाऊ शकतात याची तुम्हाला कल्पना होती का? आता हे काम केले जात आहे! ‘आयपॉड’चा शोध ज्यांनी लावला, त्या टोनी फॅडेल यांनी अशा मागनि हिरे बनवण्यास सुरुवात केली आहे. हा माणूस ’थ्री इडियटस्’च्या रँचोसारखाच वेगवेगळे प्रयोग करणारा आहे. आता त्याने गायीची ढेकर व गॅस यांच्यामधून निघणार्या मिथेन वायूचे रूपांतर हिर्यांमध्ये करण्याचा मार्ग शोधला …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र