लेख-समिक्षण
  • 29 Mar 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4207

TimeLine Layout

September, 2024

  • 29 September

    कच्च्या दुधाचे सौंर्द्यलाभ

    कच्च्या दुधामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असते जे त्वचेमधील शिथिलता कमी करण्यास खूपच मदत करते आणि त्यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत. दुधामध्ये जास्त प्रमाणात फॅट्स असल्यामुळे कच्चे दूध वापरल्यावर वेगळे मॉईस्चराईजर वापरण्याची गरज भासत नाही. * बाजारातील मॉईश्चराईजरपेक्षा नैसर्गिक दूध वापरणे अधिक चांगले आहे. तसंच लॅक्टिक अ‍ॅसिड असल्याने कच्च्या दुधामुळे त्वचेचे टॅनिंग कमी होऊन त्वचा उजळण्यास हातभार लागतो. * यासाठी …

    Read More »
  • 29 September

    हिरा बनणार 15 मिनिटांत?

    जगातील सर्वात महागडे रत्न म्हणजे हिरा, साहजिकच हिर्‍यापासून बनवलेल्या दागिन्यांच्या किमतीदेखील अन्य सर्व दागिन्यांच्या तुलनेत अधिकच असतात. नैसर्गिकरित्या हिरे तयार होण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. कार्बन अणूंचे हिर्‍यात रूपांतर होण्यासाठी कित्येक गिगापास्कल्सचा प्रचंड दाब आणि हजारो वर्षांतील 1500 अंश सेल्सिअसची तीव्र उष्णता लागते. म्हणूनच बहुतांशी हिरे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या शेकडो मैल खाली गाडलेले आढळतात. पण, उच्च दाब आणि उच्च तापमानाची गरज …

    Read More »
  • 29 September

    निरीक्षणशक्ती महत्वाची

    जगप्रसिद्ध शास्रज्ञ एडवर्ड जेन्नर यांचा जन्म 17 मे 1747 रोजी इंग्लडमधील बर्कले येथे झाला. वयाच्या 14 व्या वर्षी ते एका सर्जनकडे सात वर्षे शिकले. जिथे त्यांनी स्वतः शल्यचिकित्सक होण्यासाठी आवश्यक असलेला बहुतेक अनुभव मिळविला. जेन्नर यांचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागात होते. त्यांचे बहुतेक रुग्ण कृषी क्षेत्रातील होते आणि त्यांच्याकडे गायी आणि बैल मोठ्या प्रमाणात होते. 1788 मध्ये देवीचा रोग इंग्लडमध्ये मोठ्या …

    Read More »
  • 29 September

    रणरागिणींची नवी भरारी

    हवाई दलाच्या स्क्वाड्रन लीडर मोहना सिंग या लढाऊ विमान तेजस उडवणार्‍या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत. हे फायटर विमान देशातच विकसित करण्यात आले आहे. स्क्वॉड्रन लीडर्स भावना कंठ आणि अवनी चतुर्वेदी यांच्यासोबत, मोहना सिंग भारतीय हवाई दलात सामील झालेल्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक आहेत. कांठ आणि चतुर्वेदी या सुखोई लढाऊ विमानाचे पायलट आहेत. आतापर्यंत मोहना सिंग मिग फायटर उडवत …

    Read More »
  • 29 September

    गर्दी कशासाठी?

    तुमच्या जवळपास आज उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन किंवा तत्सम एखादा कार्यक्रम आहे का? माहिती घेऊन सांगा. महाराष्ट्रातल्या निम्म्याहून अधिक लोकांचं उत्तर होकारार्थी येईल. साहजिक आहे. लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे. मग असे कार्यक्रम करताच येणार नाहीत. तत्पूर्वी किमान कुदळ मारून घ्यावी, हा सुज्ञ विचार करून सर्वपक्षीय स्थानिक राजकारणी सध्या मतदारसंघाच्या दौर्‍यात व्यस्त आहेत. (आणि राज्यस्तरीय नेते यात्रांमध्ये!) नंतर कुदळ मारलेल्या जागी …

    Read More »
  • 29 September

    बदलापूर एन्काऊंटर वादाच्या भोवर्‍यात

    बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. हे एन्काउंटर आता वादग्रस्त ठरले असून कोर्टानेही यावरून ताशेरे ओढले आहेत. एन्काउंटरचा संपूर्ण घटनाक्रमच संशयाच्या भोवर्‍यात अडकला आहे. एवढंच नव्हे तर हे एन्काउंटर असूच शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयात याचिका दाखल झाली असताना अक्षय शिंदे चकमक प्रकरणाच्या तपासाला गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) वेग दिला आहे. सीआयडीचे …

    Read More »
  • 29 September

    एकत्रित निवडणुकीलो आव्हान ‘एकमताचे’

    केंद्रीय मंत्रिमंडळाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी स्वीकारत ‘एक देश एक निवडणुक’ प्रस्तावाला मंजुरी दिली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात विधेयक आणले जावू शकते. या विधेयकाला मिळणार्‍या संमतीवरच या निर्णयाचे भवितव्य अवलंबून असेल. एक देश एक निवडणुकीला काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल, द्रमुक, ‘आप’सारखे जवळपास 15 पक्ष आक्षेप नोंदवत असतील तर हा अजेंडा पुढे सरकेल, असे वाटत नाही. केंद्र …

    Read More »
  • 29 September

    शेअर ट्रेडिगच्या चक्रव्यूहात

    बाजार नियामक संस्था सेबीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022 ते 2024 दरम्यान 93 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांना फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सरासरी 2 लाख रुपये प्रतिव्यक्ती नुकसान झाले आहे. किरकोळ गुंतवणूकदांचं नुकसान तीन वर्षात वाढून 1.8 लाख कोटींवर पोहोचलं आहे. 4 लाख गुंतवणूकदारांना या काळात 28 लाख रुपये प्रतिव्यक्ती नुकसान झालं आहे. अलीकडील काळात ऑप्शन ट्रेडिंगच्या नादाला लागून कर्जबाजारी …

    Read More »
  • 22 September

    सिनेसृष्टीत पदार्पण

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवाली परबला मोठी लोकप्रियता मिळाली. आपल्या विनोदी शैलीने तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. शिवाली लवकरच सिनेमात पदार्पण करत आहे. मात्र या चित्रपटात ती विनोदी नाही तर एका गंभीर भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शिवाली परब ’मंगला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात मंगला ही व्यक्तिरेखा शिवाली साकारणार असल्याचं समोर आलं आहे. नुकतेच शिवालीने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले असून …

    Read More »
  • 22 September

    पसिनेमातून हद्दपार होणारे खेडेगाव

    1950 ते 1980 च्या दशकांपर्यंत बहुतांश चित्रपटांवर ग्रामीण भागाचीच छाप राहिली आहे. बैलगाडी, झोपडया, नदी-नाले, शेतीवाडी, पक्ष्यांचे थवे, डोंगर दर्‍या, पायवाट, ग्रामीण भागातील पेहराव, फेटा, धोतर पायजमा, पारंपरिक उद्योग, ग्रामदेवता या यासारख्या गोष्टी दिसायच्या. सध्याच्या काळात प्रदर्शित होणारे चित्रपट पाहिले तर ते उच्चभ्रु वस्तीचे दर्शन घडविणारे आहेत. पंचतारांकित हॉटेल्स, घरे, परदेशातील लोकेशन, समुद्रकिनारे, कॉर्पोरेट ऑफिस, महागड्या गाड्या, मेट्रो, विमान, एकमेकांवर …

    Read More »