लेख-समिक्षण
  • 29 Mar 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4207

TimeLine Layout

November, 2024

  • 3 November

    288 मतदारसंघासाठी 7,995 उमेदवारीअर्ज

    महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार दि. 29 ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडी व महायुतीकडून मंगळवारी दुपारपर्यंत आपले उमेदवार जाहीर करणं चालूच होते. अखेरपर्यंत महायुतीने व महाविकास आघाडीने त्यांचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला नाही. मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 7,995 जणांनी 10,905 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार 4 नोव्हेंबरपर्यंत …

    Read More »
  • 3 November

    विकसित भारतासाठी

    भारत आणि भारतातील लोक विकसित देशांच्या श्रेणीत असल्याचे म्हणायचे असेल तर तीन निकष पाहावे लागतील. पहिले म्हणजे प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाण्याची उपलब्धता. दुसरे म्हणजे स्थानिक सरकारी शाळेची गुणवत्ता. तिसरा मोठा निकष म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचा वापर. याखेरीज हवेची गुणवत्ता, कामगारांची उत्पादन क्षमता, आरोग्य स्थिती, ज्येष्ठांची देखभाल, वनक्षेत्र, उर्त्सजन कमी, जैवविविधता देखील निकष आहेत. याजोडीला पुढील 25 वर्षांत 30 हजार डॉलरपेक्षा …

    Read More »
  • 3 November

    घातक खोडसाळपणाचे आव्हान

    एकीकडे देशातील विमानप्रवाशांची संख्या वाढत असताना दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. गेल्या काही दिवसांत बॉम्बच्या धमक्यांमुळे इमर्जन्सी लँडिंग करण्याचे प्रकार घडले. सोशल मीडिया किंवा ईमेलच्या माध्यमातून फसव्या धमक्या दिल्या जात असताना त्यांना चाप कसा बसवावा, हा खरा प्रश्न आहे. बनावट संदेश पकडण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, तरीही सुरक्षा संस्था खोट्या धमक्या देणार्‍यांचा शोध लावू शकत नाही. यामागचे …

    Read More »

October, 2024

  • 27 October

    तेजस्विनीचा ट्रिपल धमाका

    अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आपल्या कामामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. नुकतंच तिनं राजेश मापुस्कर दिग्दर्शित ’येक नंबर’ या चित्रपटाच्या निमित्ताने लिखाण क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ती आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून तिहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘येक नंबर’ या चित्रपटात निर्मिती आणि लेखनाव्यतिरिक्त ती अभिनय करतानाही दिसणार आहे. या चित्रपटात तेजस्विनी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती …

    Read More »
  • 27 October

    सन्मान जिंदादिल अभिनेत्रीचा

    मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या सशक्त, दमदार आणि चतुरस्त्र अभिनया ने सुहास जोशी यांनी उमटवलेला ठसा अमीट आहे. भूमिकांच्या लांबी-रूंदीपेक्षा आशयाला महत्त्व देणार्‍या अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. हाती येईल ते काम उत्तम पद्धतीने करायचं हे तत्व अंगी भिनलेलं असल्यानं सुहास यांनी …

    Read More »
  • 27 October

    व्यवसायाची जागा बदलताना

    आपण एखाद्या कारणावरून व्यवसाय अन्य ठिकाणी शिफ्ट करत असाल तर त्याअगोदर स्वत:ला काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे. एक व्यवसायिक म्हणून यशस्वी होण्यासाठी कोणताही व्यक्ती शंभर टक्के प्रयत्न करत असतो. यासाठी जर व्यवसाय अन्य ठिकाणी शिफ्ट करायचा असेल तरीही तो मागेपुढे पाहत नाही. तसे पाहिले तर व्यवसाय बदलण्याचा निर्णय हा कठिण आणि अवघड मानला जातो. तो काही एखाद्या क्षणात किंवा मिनिटात …

    Read More »
  • 27 October

    लोकप्रियता बटव्याची

    फॅशनमध्ये नित्यनवीन गोष्टी येत असतात. तरूणींच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये तर सारखंच काहीतरी नवीन येत असतं. त्यांच्या अ‍ॅक्सेसरीजमध्ये सध्या बटव्याची फॅशन फारच जोरात आहे. कोणत्याही पोशाखाबरोबर बटवा सहज अ‍ॅक्सेप्ट केला जातोय. बटव्याला पर्सची उपयुक्तता आणि फॅशनची शान अशा दोन्ही गोष्टी असल्याने त्याची महती फारच वाढली आहे. * बटवे कॅरी करायला फारच सोपे आहेत. ते साडी, चुडीदार वगैरे वर तर उठून दिसतातच पण …

    Read More »
  • 27 October

    जपानमधील प्रकाशाचे गूढ

    नुकतेच जपानमध्ये किनारपट्टीला लागून असणार्‍या एका शहरातून आभाळाकडे पाहिले असता रहस्यमयरीत्या चमकणारे 9 खांब दिसले. आभाळात दिसणारे हे दृश्य पाहून स्थानिक लोक हैराण झाले. नेमकं घडतंय काय, हेच त्यांना कळत नव्हतं. सध्या सोशल मीडियावर जपानमधील हेच फोटो व्हायरल होत असून, माशी नावाच्या एका स्थानिक व्यक्तीनं घडल्या प्रकारासंदर्भात माहिती दिली. अर्थात, नंतर या प्रकाशाचे गूढही उकलले ! घरातून बाहेर पडताच त्याने …

    Read More »
  • 27 October

    डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या बालपणीची एक हृदयस्पर्शी आठवण

    मी लहान होतो तेव्हाची गोष्ट. प्रत्येक आईप्रमाणेच माझी आई आम्हा सर्वांसाठी जेवण तयार करायची. दिवसभर कष्टाची कामे करून आई खुप दमून जायची. एके रात्री आईने स्वयंपाक केला आणि माझ्या बाबांना जेवायला वाढले. त्यांच्या ताटात एक भाजी आणि एका बाजूने पुर्णपणे करपलेली भाकरी दिली. त्या जळालेल्या, करपलेल्या भाकरीबद्दल कोणी काही बोलतेय का याची मी वाट पहात होतो. परंतू बाबांनी आपले जेवन …

    Read More »
  • 27 October

    बंडखोरीला खतपाणी

    जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांचा निकाल अलीकडे जाहीर झाला. जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनी तर 2019 मध्ये कलम 370 हटविल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणूक झाली. तत्कालीन मोदी सरकारच्या या निर्णयामुळे विकासाच्या मार्गावर जम्मू आणि काश्मीर सुसाट वेगाने पळेल, असेच चित्र निर्माण झाले. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला भरभरून मते मिळतील, असा अनेकांचा होरा होता. प्रत्यक्षात मात्र भाजपला बहुमताच्या आसपास जातील एवढ्याही …

    Read More »