लेख-समिक्षण
  • 29 Mar 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4207

TimeLine Layout

December, 2024

  • 29 December

    खातेवाटपाचे उणे-अधिक

    महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले. यात अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली. भाजपचाच विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. एकप्रकारे या नेत्यांचे राजकीय वजन कमी करण्याचाच प्रयत्न केला आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातील एका भाषणात अजित पवार गिरीश महाजनांना …

    Read More »
  • 29 December

    खेळू नका!

    खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्‍याचदा यामागे अभ्यासाचं कारण असतं. कधीतरी घराबाहेर असलेल्या छोट्या-मोठ्या धोक्यांचं निमित्त असतं. कधी पाऊस तर कधी कडाक्याचं ऊन पडलेलं असतं. मुलांचं आरोग्य बिघडेल, अशी काळजी आईवडिलांना वाटत असते. नैसर्गिक धोक्यांबरोबरच मानवनिर्मित धोकेही असतात. या व्यतिरिक्तही कारणं असू शकतात. परंतु पोरांना ‘खेळू नका’ म्हणण्याचं एक अजब कारण पुढे …

    Read More »
  • 29 December

    राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष

    परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमवारी परभणीत जाऊन सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर सूर्यवंशीचा मृत्यू म्हणजे हत्या असल्याचे राहुल गांधी म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली, असाही आरोप त्यांनी केला. परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर …

    Read More »
  • 29 December

    एका पर्वाची अखेर

    भारताचे माजी पंतप्रधान आणि निष्णात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एका पर्वाची अखेर झाली आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे संचालक प्रदीप के. लाहिरी यांच्या ‘अ टाइड इन द अफेअर्स ऑफ मेन: अ पब्लिक सर्व्हंट रिमेम्बर्स’ या आत्मचरित्रामध्ये मनमोहन यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. त्यांच्या मते, मनमोहन सिंग यांचे भारतीय इतिहासातील योगदान पंतप्रधान म्हणून न राहता भारताचे अर्थमंत्री म्हणून अधिक …

    Read More »
  • 29 December

    नदीजोड प्रकल्पातून विकासगंगा

    महाराष्ट्रात नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर नद्या जोड प्रकल्पाचा संकल्प बोलून दाखवला आहे. नदी जोड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी भाग्यविधाता प्रकल्प असणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान यादरम्यान वाहणार्‍या पार्वती, कालीसिंध आणि चंबळ नद्यांचे पाणी हे मोठा जलस्रोत म्हणून पाहिले जाते. या नद्यांना जोडण्यासाठी अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नदी जोडप्रकल्पाच्या अभियानाची संकल्पना …

    Read More »
  • 22 December

    मलायका पुन्हा प्रेमात?

    अभिनेत्री मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलायका एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली आहे. तिचे काही फोटो व्हायरल झाले असून ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे. अलीकडेच मलायकाने पंजाबी गायक एपी ढिल्लोनंच्या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. तिच्यासोबत राहुल विजयनेही या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी ती स्टेजवर थिरकताना दिसली. स्वत: एपी ढिल्लोननं या त्याच्या कॉन्सर्टमधील …

    Read More »
  • 22 December

    बालपटांची उपेक्षा

    बॉलिवूडच्या आजवरच्या प्रवासामध्ये बालचित्रपटांना फारसे महत्त्व दिले गेले नाही. चित्रपटातील नायकांचे बालपण प्रभावीपणे रेखाटले जाते, मात्र एकप्रकारे नायकाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी लहान मुलांच्या पात्रांचा उपयोग केला जातो. कृष्णधवलपासून ते आतापर्यंतच्या काळात असंख्य बालचित्रपट येऊन गेले. किंबहुना मोठ्या कलाकारांचा समावेश असलेल्या बाल चित्रपटांनी काहीवेळा यशही मिळवले, परंतु ते मर्यादित राहिले. काहींची गाणी गाजली तर काहींवेळा व्यक्तिरेखा. पण त्याची व्याप्ती वाढली नाही. …

    Read More »
  • 22 December

    फेसबुकवरुन व्यवहार करताना…

    फेसबुकवरून आपण खरेदी विक्री देखील करू शकतो. परंतु आर्थिक व्यवहार करताना सुरक्षितता पाहणे अगोदरच गरजेचे आहे. सहज विश्वास ठेवू नका: फेसबुक आणि तत्सम सोशल मिडिया संकेतस्थळे ही व्हर्चऊल फ्रेंडशिपसाठी आदर्श मानले जातात. परंतु या आधारावरच या सोशल मिडियावर विश्वास ठेवणे धोक्याचे ठरते. संपूर्णपणे ऑनलाईनवर विश्वास न ठेवता डोळसपणे व्यवहार करावा. तोंडओळखीवर व्यवहार करणे टाळावे. कधी कधी फेसबुक अकाऊंट फेक असू …

    Read More »
  • 22 December

    व्यंकटगिरी साडीची क्रेझ

    आध्र प्रदेशाचे वैशिष्ट्य असणारी स्टायलिश, ट्रेंडी तितकीच साधी आणि सुंदर दिसणारी व्यंकटगिरी साडी आपले वेगळेपण राखून आहे. वजनाला हलक्या, मुलायम असणार्‍या या साड्या महिला वर्गात वेगळा ठसा उमटवून आहेत. या साड्यांमध्ये भरपूर वैविध्य असून त्या प्रामुख्याने कॉटन आणि सिल्कच्या धाग्यांपासून हातमागावर विणल्या जातात. या साड्या आंध्र प्रदेशातील नेल्लोरे जिल्ह्यातील व्यंकटगिरी या छोट्याशा गावात विणल्या जातात म्हणून, या गावाच्याच नावाने या …

    Read More »
  • 22 December

    वार्धक्य रोखायचंय?

    वार्धक्य रोखण्याबाबत सतत नवनवे संशोधन होत असते. आहारातील बदलही यासाठी उपयुक्त ठरत असतात. कमी कर्बोदके व कमी उष्मांक असलेला आहार हा वार्धक्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करतो. कारण त्यात विशिष्ट प्रकारचे संयुग असते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. ग्लॅडस्टोन प्रयोगशाळेतील संशोधक एरिक वेर्दिन यांनी सांगितले की, मानवी शरीरातील एक संयुग हे वार्धक्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. वयाशी निगडित असलेले हृदयरोग, …

    Read More »