सिनेमनोरंजनाचा खरा आनंद 70 आणि 80 च्या दशकात सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहणार्या प्रेक्षकांनी घेतला. तेव्हा पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्याचा जो जोश होता, त्याची आज कल्पनाही करता येणार नाही. शोच्या दोन तास आधी तिकीट खिडकीवर लागणारी भली मोठी रांग, तिकीट काढण्यासाठीची धडपड, प्रसंगी वादावादी-हाणामारी, ब्लॅकने होणारी तिकिट विक्री, हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठीची धडपड या सर्व गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. मल्टिप्लेक्सने …
Read More »TimeLine Layout
February, 2025
-
2 February
दिसा उठावदार
महिलांच्या तुलनेत पुरुषांना रंगनिवडीची फार चॉईस नसते. त्यामुळे कॉम्बिनेशन करताना पुरुष मंडळी नेहमीच गोंधळलेली असतात. कुर्ता पायजमा, ब्लेझर, फॉर्मल, फॅन्सि, ट्रेंडी या ठराविक स्टाईलमध्येच पुरुष मंडळींना वावरावे लागतात आणि त्याच्या शिवणकामातही वैविध्य नसते. शेवटी रंग निवडीवरच अवलबंनू राहवे लागते. काही मंडळी ठराविक रंगाची निवड करून मर्यादितच राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु सध्याच्या फॅशनच्या दुनियेत रंगात असंख्य नमुने उपलब्ध झाले असून त्याची …
Read More » -
2 February
प्राणीप्रेमी फॅशन
हटके दिसण्यासाठी सध्या कोण काय करेल हे सांगताच येत नाही. आपल्याकडे घुबड अशुभ मानलं जातं. पण फॅशन वर्ल्डमध्ये हेच घुबडही ट्रेंडी आणि लोकप्रिय झालं. घुबडच काय, पण सध्याची तरुणाई प्राणी पक्ष्यांना गळ्यात घेऊन फिरत आहेत. म्हणजे खरेखुरे नव्हे तर लेटेस्ट फॅशन अॅक्सेसरीजच्या रुपात ते त्यांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. तसं पहायला गेलं तर अॅनिमल डिझाइन्स किंवा नक्षी ती तशी पूर्वीपासूनच …
Read More » -
2 February
चंद्रावरील खडकांत पुरावे
प्राचीन काळात पृथ्वीचे वातावरण कसे होते, याचे सर्वात जुने पुरावे हे पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्रावरील खडकांमध्ये दडलेले आहेत. एका नव्या संशोधनातून ही माहिती समोर आली. नासाच्या अपोलो मोहिमेत चांद्रभूमीवरून आणलेल्या खडकांच्या अभ्यासातून ही बाब स्पष्ट झाली. 50 वर्षांपूर्वी हे खडकांचे नमुने अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनी पृथ्वीवर आणले होते. या खडकांमध्ये चुंबकीय गुणधर्मही अडकलेले आहेत. एके काळी पृथ्वीप्रमाणेच चंद्रालाही स्वतःचे …
Read More » -
2 February
पॅडादादांचा सक्सेमंत्र
पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी दादा सर्वांचे लाडके अभिनेते आहेत. उत्तम विनोदवीरांच्या यादीत पॅडी दादांचं नाव अग्रस्थानी आहे. अनेक मालिका आणि नाटकांमध्ये पॅडी दादांनी भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर ’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी अनेक प्रहसनं केली आहेत. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्याच्या खडतर प्रवासाविषयी मनोगत मांडलं. ते म्हणतात, लग्नाच्या अगोदर नाट्यक्षेत्रातील माझी परिस्थिती फारशी समरूप नव्हती. घरातल्यांचा नकार होता. कारण, …
Read More » -
2 February
सुरक्षेवर लक्ष कधी ?
प्रयागराजमध्ये सुरु असलेला महाकुंभ 144 वर्षांनी आला. या महाकुंभात मौनी अमावास्येच्या दिवशी अमृत स्नान होणार होते. त्यापूर्वी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत तीस भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानंतर सकाळी परिस्थिती नियंत्रणात आली आहे. साधू, महंत आणि भाविक गंगा स्नान करत आहेत. भाविकांना काही अडचण होऊ नये म्हणून आखाड्यांनी त्यांच्या स्नानावर स्वतःहून बंदी आणली आहे. परंतु, ही चेंगराचेंगरी नेमकी …
Read More » -
2 February
खेळता-खेळता
लहान मुलं बर्याच वेळा दारामागं लपून मोठ्यानं ‘भॉ’ करतात आणि आपल्याला किंवा एकमेकांना घाबरवतात. आपल्याला माहीत असलं, तरी आपण घाबरल्याचं सोंग करतो. जेव्हा मुलं एकमेकांना घाबरवण्याचा खेळ खेळतात, तेव्हा बर्याचदा ही अनपेक्षित घटना असते. त्यामुळे पोरं खरोखर दचकतात. दचकणारा एखाद्या वेळी चिडतोही. परंतु या दचकण्याचा जास्तीत जास्त परिणाम काय? भांडणं, अबोला वगैरे. परंतु या अत्यंत साध्या खेळाचा शेवट एखाद्या लहानग्याच्या …
Read More » -
2 February
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरमध्ये 30 ठार
महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त दुसर्या अमृत स्नान सोहळ्यासाठी प्रयागराजमध्ये मंगळवारी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासनाने केली. या चेंगराचेंगरीत 90 लोक जखमी झाल. मंगळवारी रात्री मौनी अमावस्येला अमृत स्नानासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली. संगम किनार्याजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली, अशी माहिती महाकुंभ नगरचे डीआयजी वैभव कृष्णा यांनी माहिती दिली. …
Read More » -
2 February
आत्मविश्वासाने केलेली शस्त्रक्रिया
गेल्या दोन तीन वर्षापासून गरीब, सामान्य माणूस, युवक, महिला आणि शेतकरी या चार स्तंभावर भर देणारा अर्थसंकल्प हे मोदी सरकारचे एक समान सुत्र होय. या अनुषंंगाने यंदाच्या अर्थसंकल्पातही सहा क्षेत्रांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला. विशेषत: शेती आणि शेतकरी यांच्या अनुषंगाने आत्मविश्वासपूर्ण पावले टाकण्यात आली. त्याशिवाय लघु व मध्यमउद्योग क्षेत्र तसेच पायाभूत सुविधांचा विकास, महिला आणि समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी …
Read More » -
2 February
प्रोत्साहनाची थाप
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केल्या जाणार्या पद्म पुरस्कारांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. साहित्य, कला, कृषी, क्रीडा, उद्योग, शिक्षण, सामाजिक कार्य, संशोधन आदी क्षेत्रात अमूल्य योगदान देणार्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येतो. याहीवेळी पद्म विजेत्यांत देशातील आणि विदेशातील नामवंताचा समावेश असून त्यापैकी काही जण प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिलेले आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये या पुरस्कारांमध्ये राजकीय हित बाजूला सारुन …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







