लेख-समिक्षण
  • 29 Mar 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4207

TimeLine Layout

April, 2025

  • 13 April

    कलाकारांचं दिग्दर्शनप्रेम

    दिग्दर्शन ही एक सर्जनशील आणि जबाबदारीची कला आहे. उत्कृष्ट अभिनय करणारा प्रत्येक कलाकार चांगला दिग्दर्शक होईल असे नाही. मात्र, हिंदी सिनेसृष्टीत वेळोवेळी अनेक अभिनेत्यांनी दिग्दर्शनातही आपले नशीब आजमावले आहे. काहींना यश मिळाले, तर काहींना अपयशाचा सामना करावा लागला. ही परंपरा बॉलिवूडच्या सुरुवातीपासूनच सुरू आहे. आजच्या घडीला अजय देवगण, नंदिता दास, हेमा मालिनी, नसीरुद्दीन शाह, अनुपम खेर आणि पूजा भट्ट यांसारख्या …

    Read More »
  • 13 April

    डिलीट झालेले व्हॉटसअ‍ॅप मेसेज पाहायचेत?

    व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ या फीचरमुळे पाठवलेले संदेश डिलीट करण्याची सुविधा मिळते. त्यामुळे अनेकदा उत्सुकता निर्माण होते की हा संदेश नक्की काय होता. मात्र, काही खास पद्धतींच्या मदतीने तुम्ही हे डिलीट केलेले संदेश वाचू शकता. 1. नोटिफिकेशन हिस्ट्रीचा वापर अँड्रॉइड 11 आणि त्यापुढील आवृत्त्यांमध्ये नोटिफिकेशन हिस्ट्री हे फीचर उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही डिलीट केलेले संदेश पाहू शकता. यासाठी: सेटिंग्समध्ये …

    Read More »
  • 13 April

    पांडा पॅरेटिंग म्हणजे काय?

    सर्व पालकांना त्यांच्या मुलांमध्ये स्वावलंबी होण्याची गुणवत्ता असावी असे वाटत असते. असे असले तरी बरेचदा मुलांचे संगोपन करताना पालकांकडून झालेल्या काही चुका मुलांचा आत्मविश्वास कमी करण्यास कारणीभूत ठरतात. परिणामी, भविष्यात मुलांना स्वतःशी संबंधित कोणताही निर्णय घेताना खूप संकोच वाटतो. याबाबत वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर आयुष्याच्या परीक्षेत ते इतर मुलांपेक्षा मागे पडू लागण्याची शक्यता असते. • मुलांमधील हरवलेला आत्मविश्वास परत …

    Read More »
  • 13 April

    रोबोटिक नी रिप्लेसमेंट का फायद्याची?

    बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, सतत लिफ्टचा वापर, दीर्घकाळ नियमित गाडीवर फिरणे, पोषणतत्वरहीत आहाराचे दीर्घकाळ सेवन, लठ्ठपणा यांसारख्या अनेक कारणांमुळे अलीकडील काळात सांधेदुखीची समस्या भेडसावणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः आपल्याकडे महिलांना स्वयंपाकादी कामांसाठी आयुष्यातील अनेक वर्षे दररोज ओट्यापुढे बरेच तास उभे राहावे लागते. तसेच घरातील कष्टाची कामे करावी लागतात. तरुणपणात या सर्वांचे परिणाम जाणवत नाहीत; मात्र शरीर वृद्धत्वाकडे झुकू लागले …

    Read More »
  • 13 April

    चिनू कालाः संघर्षातून यशाकडे झेप

    उद्योजकतेची खरी ओळख म्हणजे संघर्षातून स्वतःला घडवत, अपयशांवर मात करत यशाची नवी उंची गाठणं. अशीच एक प्रेरणादायक कहाणी आहे चिनू काला यांची जी एकेकाळी घराघरात वेगवेगळ्या वस्तू विकणारी एक साधी मुलगी होती आणि आज रुबन्स अ‍ॅक्सेसरीज या प्रसिद्ध ब्रँडची संस्थापक आहे. चिनू काला यांचं बालपण फारसं सुखकर नव्हतं. केवळ 15 व्या वर्षी, कौटुंबिक मतभेदांमुळे त्यांनी घर सोडलं. हातात पैसा नव्हता, …

    Read More »
  • 13 April

    बनावट डॉक्टरांचे आव्हान

    भारतातील आरोग्य व्यवस्था ही अनेक आव्हानांनी ग्रासलेली आहे. त्यात सर्वाधिक गंभीर आणि धोकादायक बाब म्हणजे बनावट डॉक्टरांचे वाढते प्रमाण. ग्रामीण भागांपासून ते शहरांतील झोपडपट्ट्यांपर्यंत अनेक ठिकाणी वैद्यकीय शिक्षण, परवाना किंवा पात्रता नसलेले लोक ‘डॉक्टर’ म्हणून रुग्णांवर उपचार करताना आढळतात. या प्रकारामुळे रुग्णांचे आरोग्य, जीवन आणि संपूर्ण आरोग्य व्यवस्था धोक्यात येते आहे. बनावट डॉक्टरांविषयी अनेकदा चिंता व्यक्त केली गेली आहे. मात्र …

    Read More »
  • 13 April

    अधिवेशनातून काय साधले?

    काँग्रेस पक्षाचे अधिवेशन गुजरातमध्ये तब्बल 64 वर्षांनंतर झालं. अहमदाबाद येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रियंका गांधींची अनुपस्थिती कार्यकर्त्यांसाठी केवळ निराशाजनक आणि आश्चर्यजनक नव्हती, तर ती रहस्यमयही ठरली. दुसरी गोष्ट म्हणजे, काँग्रेससमोरील मोठी समस्या ही आहे की तिच्याकडे गुजरातमध्ये मूळचा असा एकही नेता नाही, जो मुख्यमंत्रीपदासाठी सशक्त उमेदवार ठरू शकेल. तरीही काँग्रेस किंवा राहुल गांधी आपली लढाई गुजरातमध्ये केंद्रित करून ‘राजा’लाच …

    Read More »
  • 13 April

    तपासाची ‘दशा ’

    एखादी व्यक्ती बेपत्ता होते. बरीच वर्षं तिचा शोध लागत नाही. अखेर ती या जगात नाही, असं सगळे मानू लागतात… आणि अनेक वर्षांनंतर ती व्यक्ती जिवंत असल्याचं समोर येतं. नाटक-सिनेमासाठी ही कथा ठीक आहे; पण प्रत्यक्षातही अशा काही घटना घडल्या आहेत. अर्थात, ज्याकाळी संपर्कमाध्यमं अत्यल्प होती, त्या काळात अशा घटना पाहायला मिळतात. विशेषतः युद्धावर गेलेला एखादा सैनिक बेपत्ता झाल्यास तो मरण …

    Read More »
  • 13 April

    40 हजारांसाठी मृतदेह 6 तास अडवला

    पुण्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातही रुग्णासोबत संतापजनक प्रकार घडला आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह 40 हजार रुपयांच्या बिलासाठी रोखून ठेवल्याचा प्रकार मलकापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये बुधवारी घडला. शिवसेना (उबाठा) पदाधिकार्‍यांनी तोडफोडीचा इशारा दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन हादरले. अखेर शिवसैनिकांनीच हा मृतदेह उचलून नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील कमलबाई यादव इंगळे (वय 68) या 5 एप्रिल रोजी घरात पाय घसरून …

    Read More »
  • 13 April

    अवकाळीनं मोडले कंबरडे

    अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वार्‍यांचा संगम होऊन मागील आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने थैमान घातल्याचे दिसून आले. या पावसाचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. यादरम्यान झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा, डाळिंब, भाजीपाला, द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळपास 1400 हेक्टरवरील पीकाला याचा फटका बसला आहे. बेमोसमी पाऊस आणि त्यामुळे शेतीचे आणि शेतकर्‍यांचे …

    Read More »