लेख-समिक्षण
  • 9 august 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

October, 2024

  • 12 October

    नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करताना…

    ही वर्षांपूर्वी नोकरीसाठी अर्ज भरण्यासाठी एक पारंपारिक पद्धती वापरली जात असे. बर्‍याचदा पोस्टाद्वारे अर्ज केल्यानंतर तो अर्ज पोहचला की नाही, हे पाहण्यासाठी कुठलीच सोय उपलब्ध नव्हती. ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या पद्धतीमुळे या समस्यांचे निराकरण झाले आहे. पण ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या गोष्टी काय आहेत ते पाहू. ———————– सध्याच्या काळात नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज पाठवावा लागतो. ही …

    Read More »
  • 12 October

    दीडशे किलोंचे ‘सॅटेलाईट ड्रोन’

    ब्रिटनमधील एका कंपनीने सॅटेलाईटशी स्पर्धा करणार्‍या सोलर-इलेक्ट्रिक ड्रोनची निर्मिती केली आहे. ‘पीएचएएसए-35’नावाचे हे ड्रोन सॅटेलाईटपेक्षाही सरस असल्याचा कंपनीचा दावा आहे. लवकरच ते सॅटेलाईटची जागाही घेऊ शकेल असेही कंपनीचे म्हणणे आहे. हे ड्रोन पांडाच्या वजनाइतके म्हणजेच केवळ 150 किलोंचे आहे. एखाद्या सॅटेलाईटचे वजन हजारो किलोंचे असते. हे ड्रोन बनवण्यासाठीचा खर्चही तुलनेने अतिशय कमी आहे. सॅटेलाईट म्हणजेच कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीच्या वातावरणाच्या …

    Read More »
  • 12 October

    टाटांची जीवनमूल्ये

    भारतीय उद्योग विश्वामध्ये गेल्या सहा दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणार्‍या टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे उद्योगविश्वावर शोककळा पसरली आहे. पण त्यांच्या निधनानंतरही अजरामर झालेली त्यांची काही वाक्यं ही फक्त नव्या पिढीसाठीच नाही, तर त्यांच्या समकालीन आणि पुढे येणार्‍या कित्येक पिढ्यांनाही प्रेरणा देत राहतील. उद्योगासोबतच रतन टाटांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी केलेले अखंड प्रयत्न यातूनच …

    Read More »
  • 12 October

    सत्ताधार्‍यांना आरसा

    सरकारच्या धोरणांवर आणि निर्णयांवर टीका करणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने सत्तेत असलेल्यांना आरसा दाखवला आहे. राज्यांतील विविध राजकीय पक्षांच्या सरकारांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे दडपशाहीला बळी पडलेल्या पत्रकारांसाठी सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी निश्चितच दिलासा देणारी आहे. अनेक राज्यांत पत्रकारांना अटक, मारहाण आणि गंभीर कलमांखाली तुरुंगात टाकण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. अनेक पत्रकार संशयास्पद परिस्थितीला …

    Read More »
  • 12 October

    विचित्र ‘केस’

    दहा ऑक्टोबर हा जागतिक स्तरावर साजरा केला जाणारा एक विशेष दिवस आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे, तो ज्यांच्यासाठी साजरा केला जातो त्यातील बहुसंख्यांना त्याची कल्पनाच नसते आणि तो साजरा करणं आपल्यासाठीही आवश्यक आहे, याची कल्पना इतररांना नसते. 1992 पासून साजरा केला जाणारा हा दिवस म्हणजे जागतिक मानसिक आरोग्य दिन. शरीराप्रमाणं मन हा डोळ्यांना न दिसणारा अवयव आजारी पडू शकतो, याची आपल्याला …

    Read More »
  • 12 October

    हरियाणात काँग्रेसचे पानिपत

    लोकसभा निवडणुकीनंतरची हरियाणातील विधानसभा निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस यांच्यासाठी ’लिटमस टेस्ट’ होती. काँग्रेसमधील पक्षांतर्गत कलह आणि मुख्यमंत्रिपदावरून भूपेंद्रसिंह हुडा व कुमारी सेलजा या प्रमुख नेत्यांमधील भांडणे हे पराभवाचे ठळक कारण मानले जाते. तसेच वादग्रस्त बाबा राम रहीम याला निवडणुकीच्या तोंडावर अचानक पॅरोल देण्यात आला. त्याने भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले व त्याच्या समर्थकांनी, विशेषतः दलित समाजाने भाजपच्या पारड्यात मते …

    Read More »
  • 12 October

    दीपस्तंभ…

    रतनजी टाटा यांच्या निधनाने देशाचा एक तेजस्वी तारा निखळला आहे. आज जगातील पाचव्या क्रमांकावर पोहोचलेल्या भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात आणि रोजगार निर्मितीमध्ये त्यांचे योगदान इतिहास कधीही विसरु शकणार नाही. आपण आयुष्यात काय करतो, किती पैसा मिळवतो यापेक्षाही दैनंदिन व्यवहारात आपलं आचरण हे नम्रतापूर्ण, शालीनतापूर्ण असलं पाहिजे आणि तीच आपली खरी ताकद आहे. ही खूप मोठी शिकवणूक रतन टाटांसोबतच्या क्षणांनी मला …

    Read More »
  • 12 October

    ‘स्वच्छ’ भरारी

    भारतात ‘स्वच्छ भारत मिशन’मुळे 2011 ते 2020 या दरम्यान वार्षिक 60 ते 70 हजार बालमृत्यु रोखण्यास मदत झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. देशातील 35 राज्य आणि 640 जिल्ह्यांतील बाल मृत्युदर आणि पाच वर्षांपर्यंतच्या बाळांचा मृत्युदराच्या आकड्यांचे आकलन करताना स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी आणि त्यापूर्वीची स्थिती याची तुलना करण्यात आली. यात देशात बालमृत्युच्या दरात मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले. ज्या …

    Read More »
  • 6 October

    ‘मिर्झापूर’चा कालिन भैय्या बदलणार

    ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा पहिला सीझन 2018 मध्ये रिलीज झाला होता, ज्याला लोकांनी खूप पसंती दिली होती आणि त्यानंतर दुसरा सीझन 2020 मध्ये आणि तिसरा सीझन 2024 मध्ये रिलीज झाला होता. तिन्ही सीझनला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती जढढ ची सर्वात यशस्वी मालिका ठरली. आता ‘मिर्झापूर’चे चाहते चौथ्या सीझनची वाट पाहत आहेत. या मालिकेची केवळ कथाच नाही तर त्यात …

    Read More »
  • 6 October

    भयपटांना तडका मनोरंजनाचा

    कृष्णधवलच्या काळापासून पडद्यावर भूतखेताच्या गोष्टी, भटकणारे आत्मे दाखवले गेले आहेत. भटकणार्‍या आत्म्यांना अनेक किश्श्यांनी जोडले जाते. कधी पुर्नजन्माच्या माध्यमातून तर कधी तंत्र मंत्रातून तर कधी नायकाच्या इर्षेतून आत्म्यांचा प्रभाव दाखविला जातो. आधुनिक बॉलिवूडमध्ये देखील अशा कथानकांवर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत आणि त्याला लोकप्रियताही मिळत आहे. मात्र सर्वात मोठा फरक म्हणजे त्याला मनोरंजनाचा तडका मारला जात आहे. कारण आजकालचा …

    Read More »