लेख-समिक्षण

व्यक्ति विकास

एमिलिया क्लार्कची प्रेरणादायी कहाणी

तुम्हाला ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेतून डेनेरिस टार्गेरियनची भूमिका करणारी एमिलिया लार्क परिचित असेल. परंतु तुम्हाला हे कदाचित ठाऊक नसेल की ‘गेम ऑफ थ्रोन्स‘च्या सुरुवातीच्या सिझनदरम्यान तिला दोन भयानक मेंदूतील गाठी (ब्रेन अ‍ॅॅन्युरिझम) झाल्या होत्या ज्यामुळे तिचा जीवही जाऊ शकला असता. पहिल्या सिझनच्या अगोदरच, व्यायाम करताना तिच्या डोयात भोसकावे, कापल्यासारखे तीव्र वेदना होऊ लागल्या. तपासणीसाठी केलेल्या एमआरआय स्कॅनमध्ये अ‍ॅन्युरिझम असल्याचे …

Read More »

‘या’ लोकांनी पिऊ नये नारळपाणी

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. कारण त्यात भरपूर पोषक घटक असतात. हे प्यायल्याने डिहायड्रेशन होत नाही आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत होते. व्यायामानंतर नारळ पाणी प्यायल्याने स्नायूंना खूप आराम मिळतो. हे सर्व आहेत नारळाच्या पाण्याचे फायदे पण तुम्हाला माहीत आहे का की, ते पिण्याचे फायदे तर आहेतच पण काही गंभीर तोटे देखील होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मतानुसार, काही …

Read More »

संगणकविश्वातील ‘बग’ शोधणारी जननी

ग्रेस हॉपर या अमेरिकन संगणकतज्ज्ञ आणि नौदलातील अधिकारी होत्या. आज आपण कंप्यूटर प्रोग्रामिंग ही जी गोष्ट सहज मानतो, त्याचा पाया घालण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पण त्यांच्याशी निगडित एक आगळावेगळा प्रसंग संगणक क्षेत्रातील संज्ञाचक्र बदलून गेला. १९४७ साली हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागात मार्क-२ नावाचा एक भला मोठा संगणक वापरात होता. हा संगणक खोलीभर जागा व्यापून बसलेला, हजारो व्हॅयूम ट्यूब्सनी चालणारा …

Read More »

पुरातही तग धरणार बार्ली

जागतिक तपमानवाढीमुळे पृथ्वीवरील हवामान बदलत आहे, त्यामुळे कुठे पूर तर कुठे दुष्काळ अशी स्थिती आतापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकणार्‍या अन्नधान्याच्या प्रजाती तयार करण्याचे काम सुरू आहे. अलीकडेच संशोधकांनी पुराच्या पाण्यातही वाढू शकेल, अशी बार्ली म्हणजे जवाची प्रजात तयार केली आहे. इंग्लंडमधील नॉटिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांनी यापूर्वी कमी ऑक्सिजनवर जगणारी वनस्पतींची प्रजात तयार केली होती. तीही प्रतिकूल …

Read More »

प्रामाणिकपणाचा असाही आदर्श

सिंगापूरमधील एका मोठ्या घरात सिसिल ब्राउन नावाचे इंग्रज डॉटर एकटे राहत होते. त्यांनी अनेक प्राणी आणि पक्षी पाळले होते आणि त्यांच्यावर ते लहान मुलांसारखे प्रेम करत होते. त्यांच्या शेजारीच मिग नावाचा चौदा वर्षांचा गरीब मुलगा एकटा राहत होता. तो डॉटर ब्राउन यांचे कपडे धुत असे आणि इस्त्री करत असे. दरम्यान इंग्रज आणि जपानी यांच्यात युद्ध सुरू झाले. युद्धाच्या काळात मिग …

Read More »

जहाजबुडीची चिंता मिटली!

कधीही न बुडणारे जहाज’ अशी जाहिरात करून निघालेले टायटॅनिक हे महाकाय जहाज आपल्या पहिल्याच सफरीत, अवघ्या चारच दिवसांच्या प्रवासानंतर अटलांटिक महासागरात हिमनगाला धडकून बुडाले होते. शंभर वर्षांपूर्वीच्या या दुर्घटनेनंतर तंत्रज्ञानात बरीच सुधारणा झाली आहे आणि अधिक सुरक्षित जहाजे, नावा तयारही होत आहेत; मात्र तरीही जहाज, नौका बुडून अनेक लोक दरवर्षी मृत्युमुखी पडत असतात; पण आता बोटींवर आघात झाल्यानंतरही त्या बुडणार …

Read More »

सायकल चोरीला गेली नसती तर….

१९५४ मध्ये जेव्हा कॅसियस फक्त बारा वर्षांचा होता, तेव्हा तो आपल्या मित्रांसोबत लुईव्हिल येथील कोलंबिया सभागृहात ‘होम शो’ पाहायला गेला होता. प्रदर्शनात फर्निचर आणि घरगुती उपकरणांबरोबरच मुलांना मोफत पॉपकॉर्नसारख्या लहानसहान आनंददायी गोष्टी देखील मिळाल्या. पण जेव्हा कॅसियस बाहेर आला तेव्हा त्याची लाडकी लाल-पांढरी सायकल चोरीस गेली होती. हताश आणि रागावलेला कॅसियस तक्रार करण्यासाठी एका पोलिसाकडे गेला. त्याने रागाने त्या पोलिसाला …

Read More »

रोज दाढी करावी का?

फॅशन आणि ट्रेंडचे शौकीन असलेले लोक अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या दाढी ठेवतात आणि त्यांच्या आवडीनुसार त्याला शेप देतात. अनेकांना साबणाच्या वडीसारखा क्लीन-शेव्ह लूक आवडतो, तर काही लोक त्यांच्या शरीराच्या प्रकारानुसार आणि व्यवसायानुसार दाढी ठेवतात. काही लोकांना दररोज सकाळी दाढी करणे आवडते, तर काही लोक महिनाभरही दाढी करत नाहीत. दाढी करणे ही बर्‍याच लोकांसाठी सामान्य गोष्ट आहे; परंतु यामुळे प्रश्न निर्माण होतो. …

Read More »

गांधीजी आणि करचोरी

महात्मा गांधी नेहमीच सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याचे सांगत असत. पण धावपळीच्या जीवनात ही तत्त्वे फक्त बोलण्यापुरतीच राहतात. प्रत्यक्ष आयुष्यात त्यांची अंमलबजावणी करणं कठीण वाटतं. मात्र, जर आपण ती मनापासून जगलो, तर ती आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतात. याचं एक प्रत्यक्ष उदाहरण गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत दाखवून दिलं होतं. गांधीजी त्या काळी दक्षिण आफ्रिकेत वकिली करत होते. एके दिवशी त्यांच्याकडे …

Read More »

आरोग्यवर्धक ‘लाल सोने ’

जगातील सर्वात महागडा मसाला म्हणजे केशर. इराणमधून अतिशय चांगल्या दर्जाचे केशर जगभर निर्यात केले जात असते. आपल्याकडे काश्मीरमध्येही केशराची शेती होते. हे ‘लाल सोने’ स्वाद व सुगंधासोबतच आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक असते. आहारात केशरचा नियमित समावेश केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. केशरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते, असे …

Read More »