लेख-समिक्षण

‌‘ओनलीनेस‌’ कडे पाहताना…

आपल्या डोक्यात अचानक एक नवी कल्पना आली आणि ती मोठ्या आवाजात आपण सांगू शकलो नाही, असा प्रसंग आपल्याही आयुष्यात कधी आला आहे का? त्यावेळी कदाचित आपल्या विचाराला फारसे कोणी गांभीर्याने घेणार नाही. मात्र स्वत:च्या विचाराचा कायम पुरस्कार करणे हे गरजेचे आहे. स्वत:ला कमी न लेखणे आणि भूमिकेवर ठाम राहणे ही बाब व्यक्तिमत्त्व विकासाला आणि प्रतिमा निर्माण करण्यासाठी फायद्याची ठरते. जर आपले मत योग्य असेल तर कालांतराने विरोध करणारी मंडळी आपल्या मागे आल्याशिवाय राहत नाहीत. लेखिका नीलोफर मर्चंटने आपले पुस्तक ‌‘पॉवर ऑफ ओनलीनेस‌’ यासंदर्भात काही संकल्पना आणि कल्पना मांडल्या आहेत. जर आपण एखाद्या विशिष्ट परिस्थितीत एकटे असाल तर आपल्यासाठी ही अवस्था ‌‘यूनीकनेस‌’ म्हणजेच वैशिष्ट्येपूर्ण असते. यास आपण मूल्याशी जोडू शकतो. ‌‘ओनलीनेस‌’ला आपण स्वत:च्या फायद्यासाठी उपयोगात आणू शकतो. आपण एखाद्या खास कामासाठी एकटेच काम करत असाल तर जग सुरवातीला आपल्याकडे दुर्लक्ष करेल, मात्र कालांतराने हेच जग तुमच्या मागे धावेल. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शास्त्रज्ञ होय. ते आपल्याच विचारात, भूमिकेत हरविलेले असतात. कालांतराने जगाकडून त्यांच्या विचाराची, शोधाची दखल घेतली असते. यूनिकनेसला ओळखा
काही वेळा आपल्या ओनलीनेसवरून चेष्टा केली जाईल, असा काही जण विचार करतात. काही अंशी बाब खरीही ठरते. मात्र प्रत्येकालाच ही मात्रा लागू पडते असे नाही. म्हणून ओन्लीनेसचा एन्जॉय करायला हवा. हॉर्वर्ड बिझनेस रिव्हच्या मते, अनेक नवीन कंपन्या केवळ ओन्ली आयडियाजला महत्त्व देत आहेत. सध्याच्या काळात यूनिक व्हिजन आणि भूमिका जगासमोर योग्य रितीने मांडता असाल तर चांगला फायदा होऊ शकतो. आपण इतरांना कॉपी करण्यापेक्षा स्वत:ला ओळखण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या विचारांना आपण पूर्ण महत्त्व द्यायला हवे. जर आपण आपल्या ओन्लीनेसला प्रोत्साहन देत असाल तर ही बाब आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरू शकते. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि ज्यावर आपला विश्वास आहे, त्यावर अढळ राहणे गरजेचे आहे. एखादा विचार आपल्यासाठी का महत्त्वाचा आहे, याचा शोध घ्यायला हवा. त्याच्या खोलाशी निगडीत राहा. आपला ओनली स्टेटस नेहमीच कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पांढरे बुट घालणारे आपण एकमेव व्यक्ती ठरू शकतो किंवा संपूर्ण पार्टीत आपण एकमेव युवती ठरू शकता. या गोष्टीवर आपल्याला नेहमीच अभिमान वाटला पाहिजे. आपण आपल्या निवडीवर आणि पसंतीवर नेहमीच स्वतंत्रपणे राहिले पाहिजे. स्वत:ला कमी लेखू नका. आपला मार्ग स्वत:च निवडा. संधीच्या शोधात राहा. आपले ध्येय समजून घ्या आणि त्याचा ध्यास घ्या. जेव्हा आपण ओनलीनेसमध्ये राहत असताना दुसऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेण्याची सवय लागते. या माध्यमातून आपण यशोशिखराजवळ पोचू शकतो. परिणामी आपण कामाचा आनंद घेऊ लागतो.पांढऱ्या कपड्यातील समूहात वेगळ्या रंगाचा व्यक्ती हा लक्ष वेधून घेणारा ठरतो. असेच व्यक्तिमत्त्व बाळगणे अपेक्षित आहे.

Check Also

एकाग्रता वाढवण्यासाठी…

अभ्यासाला बसल्यावर काही मिनिटांतच मोबाईल हातात जातो, एखादे काम सुरू केले की मध्येच सामाजिक माध्यमांवरील …