बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा तब्बल 18 वर्षांनंतर एका मोठ्या बजेटच्या ॲक्शन चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. 2007 मधील ‘कॅश’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर या दोघांमध्ये कोणताही संपर्क नव्हता, मात्र आता त्यांच्यातील दुरावा संपला आहे. अनुभव सिन्हा यांनी स्पष्ट केले होते की, त्यांच्यात वैयक्तिक असा कोणताही वाद नव्हता, तर तो मतभेद चित्रपटाचे निर्माते आणि फायनान्सर्स यांच्यात होता. प्रसिद्ध निर्माते कुमार मंगत यांनी या दोघांमधील दुरावा मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. काही महिन्यांपूर्वी कुमार मंगत यांनी या दोघांची भेट घडवून आणली. या भेटीत अनुभव सिन्हा यांनी अजय देवगणला एक स्क्रीप्ट ऐकवली. अजय देवगण, कुमार मंगत आणि निर्माते भूषण कुमार यांना ही कथा प्रचंड आवडली असून भूषण कुमार या चित्रपटाची निर्मिती करण्याची शक्यता आहे. हा चित्रपट अनुभव सिन्हा यांच्या पूर्वीच्या ‘दश’ (2005) किंवा ‘रा.वन’ (2011) या चित्रपटांसारखाच एक भव्य आणि मनोरंजक ॲक्शनपट असेल. – राधिका बिवलकर
Check Also
तापसी बनली ब्रँड ॲम्बसेडर
प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूची आता ‘इनॅमर’ या नामांकित ब्रँडच्या नवीन मोहिमेसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड …
पांचजन्य वृत्तपत्र