आपल्या काही वर्षांमध्ये कोल्ड फेशियलचा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे. अनेक महिला आणि सेलिब्रिटी बर्फाच्या थंड पाण्यात चेहरा काही सेकंदांसाठी बुडवतात.
© पूर्वी फेशियल प्रक्रियेमध्ये चेहऱ्यावर थंड टॉवेल ठेवण्याची पद्धत प्रचलित होती. याचा उद्देश सूज कमी करणे, डोळ्यांखालील काळी वर्तुळे घटवणे आणि त्वचेला ताजेतवाने बनवणे असा असायचा. आता या प्रक्रियेला अधिक थेट आणि प्रभावी स्वरूप दिले गेले असून बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवण्याची पद्धत वापरली जात आहे.
©ही पद्धत वापरण्यास अतिशय सोपी आहे. एका भांड्यात बर्फ आणि पाणी घ्या, चेहरा स्वच्छ धुऊन घ्या आणि मग चेहरा त्या पाण्यात काही सेकंदांसाठी बुडवा. नंतर चेहरा बाहेर काढल्यावर त्वचेवर लगेचच एक ताजेपणा आणि चमक दिसून येते.
©जर तुम्ही दर आठवड्याला किमान दोनदा ही पद्धत वापरली, तर डोळ्यांखालील सूज कमी होऊ शकते, त्वचेतील मोठे रोमछिद्र तात्पुरते टाईट होतात आणि जर त्वचेवर ॲक्ने किंवा एलर्जी असेल, तर त्यावरही आराम मिळतो. तसेच सनबर्न झाल्यावरही ही पद्धत उपयोगी ठरते.
©कमी मेहनतीत आणि घरच्या घरी चेहऱ्याची देखभाल करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. पण लक्षात ठेवा, अती वापर केल्यास त्वचा कोरडी होऊ शकते, त्यामुळे प्रमाणातच वापर करावा.
Check Also
जन्मानंतर बाळाचा रंग सावळा का होतो ?
बाळ जन्माला आले की, त्याचे गुलाबी-पांढरे रूप पाहून सर्वच जण सुखावतात. मात्र, काही आठवड्यांनंतर हळूहळू …
पांचजन्य वृत्तपत्र