नेटफिल्क्सवर डब्बा कार्टेल या नव्या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिरीजचे दिग्दर्शन हितेश भाटिया यांनी केले असून सिरीजमध्ये सहा मध्यमवर्गीय महिलांची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. ज्योतिका आणि मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर या सिरीजमध्ये मुख्य भूमिका आहेत. सई पोलीस अधिकार्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सिरीज 28 फेब्रुवारीला नेटफिक्सवर रिलीज केली जाणार आहे.
पाच मध्यमवर्गीय महिला आपले नेहमीचे जीवन जगत असतात. यातच एक अशी घटना घडती की त्यात या महिला अडकतात. ती गोष्ट म्हणजे अमली पदार्थांची तस्करी. यानंतर त्यांच्या आयुष्यात काय काय घडते आणि पुढे काय समोर येते याचे चित्रण या सिरीजमध्ये दाखविण्यात आले आहे. एक मिनिट आणि नऊ सेकंदांच्या टीझरमध्ये शबाना आझमी एका व्यावसायिक महिलेची सशक्त भूमिकेत दिसते. मध्यमवर्गीय महिला टिफीन सर्व्हिसच्याद्वारे अमली पदार्थांच्या व्यवसायात काम करत असल्याने याची भनक पोलिसाची व्यक्तीरेखा साकारणार्या सई ताम्हणकरला लागते. यानंतर ती ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी या गोष्टीचा शोध घेते. या सिरीजचा टीझर एक्सेल मीडिया आणि एंटरटेनमेंट एलएलपीचे निर्माते रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी शेअर केला आहे. या वेबसिरीजचे लेखन विशाल मेनन आणि भावना खेर यांनी केले आहे.
आम्ही नेटफ्लिक्ससह सहकार्य करत असताना डब्बा कार्टेल आमच्यासाठी एक रोमांचक नवीन अध्याय आहे. ही मालिका पाच मध्यमवर्गीय महिलांची अनिच्छेने ड्रग्ज कार्टेल सुरू करण्याची नाट्यमय कथा आहे ज्याचा शेवट एका मोठ्या फार्मा घोटाळ्याशी होतो. ज्याची चौकशी सुरू आहे. या प्रवासाला सुरुवात करताना आम्हाला आनंद होत असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.- जगदीश काळे
Check Also
गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी
बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …
पांचजन्य वृत्तपत्र