लेख-समिक्षण

प्राणीप्रेमी फॅशन

हटके दिसण्यासाठी सध्या कोण काय करेल हे सांगताच येत नाही. आपल्याकडे घुबड अशुभ मानलं जातं. पण फॅशन वर्ल्डमध्ये हेच घुबडही ट्रेंडी आणि लोकप्रिय झालं. घुबडच काय, पण सध्याची तरुणाई प्राणी पक्ष्यांना गळ्यात घेऊन फिरत आहेत. म्हणजे खरेखुरे नव्हे तर लेटेस्ट फॅशन अ‍ॅक्सेसरीजच्या रुपात ते त्यांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. तसं पहायला गेलं तर अ‍ॅनिमल डिझाइन्स किंवा नक्षी ती तशी पूर्वीपासूनच प्रचलित आहे. म्हणजे साड्यांवर मोर, हत्ती यांची डिझाईन्स असायची. आताही दिसतात. मात्र सध्या त्यांना नव ग्लॅमर आले आहे. नेकलेस, ब्रेसलेट, अंगठ्या, कानातले टॉप्स अशा ज्युलरीमध्ये विविध प्राणी पक्ष्यांचा समावेश झाला आहे. घुबड, हत्ती, मोर, साप, ड्रॅगन, सिंह आणि अगदी पालीच्या आकाराची ज्वेलरीही आजच्या हौशी तरुणाींमध्ये दिसून येते. अशी ज्वेलरी वापरण्यामागे अर्थातच फॅशनचा एक भाग असला तरी त्यातून आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख सांगण्याचाही प्रयत्न असतो. अ‍ॅनिमल ज्युलरी लोकप्रिय होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला आवडणारे प्राणी हव्या त्या आकर्षक रंगात उपलब्ध आहेत. त्यामुळे थोडा हटके आणि इंटरेस्टिंग लुक मिळतो. ही ज्वेलरी वेस्टर्न आऊटफिटवर खुलून दिसते.

Check Also

लहान मुले आणि व्हिडिओ कॉलिंग

लहान मुलांच्या निरागस हालचाली सर्वांनाच मोहवून टाकतात. अनेकदा दूर राहणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी बाळाला पाहण्यासाठी …