महिलांच्या तुलनेत पुरुषांना रंगनिवडीची फार चॉईस नसते. त्यामुळे कॉम्बिनेशन करताना पुरुष मंडळी नेहमीच गोंधळलेली असतात. कुर्ता पायजमा, ब्लेझर, फॉर्मल, फॅन्सि, ट्रेंडी या ठराविक स्टाईलमध्येच पुरुष मंडळींना वावरावे लागतात आणि त्याच्या शिवणकामातही वैविध्य नसते. शेवटी रंग निवडीवरच अवलबंनू राहवे लागते. काही मंडळी ठराविक रंगाची निवड करून मर्यादितच राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु सध्याच्या फॅशनच्या दुनियेत रंगात असंख्य नमुने उपलब्ध झाले असून त्याची निवड करून आपण साधेपणातही उठावदार दिसू शकतो.
थोडे साहसी व्हा : वन कलर ट्रिकचा अर्थ असा नाही की, एकाचवेळी आपण न्यूट्रल कलरसमवेत एकच रंगाचा वापर करावा. आपण दोन रंगाचा देखील वापर करू शकता. परंतु दोन्ही रंग हे एकाच पॅटर्नमधील असावेत, याबाबत खात्री बाळगावी. उदा. काळ्या रंगाच्या पँटवर लाल रंगाचा शर्ट आणि त्यावर करड्या रंगाचे जॅकेट हे कॉम्बिनेशन अचूक ठरेल. पांढर्या रंगाची पँट आणि हलका हिरव्या रंगाचा शर्ट आणि गडद हिरव्या रंगाचे ब्लेझर हे कॉम्बिनेशन उठावदार ठरते. पांढरा शर्ट, हिरवे जॅकेट आणि खाकी रंगाची पॅट हा देखील पेहरावाचा योग्य ताळमेळ आहे. एकापेक्षा अधिक रंग असले तर त्यापैकी दोन रंग एकाच फॅमिलीतील असावेत.
वन कलर ट्रिक : जर आपल्याला रंगाचा खेळ फार आत्मविश्वासात्मक वाटत नसेल तर न्यूट्रल रंगाबरोबरच आपण वन कलर ट्रिकचे अनुकरण करा. याचाच अर्थ एक न्यूट्रल कलर आणि त्याचवेळी आणखी एका रंगाचा समावेश होतो. उदा. काळ्या रंगाची पँट आणि त्यावर गुलाबी रंग किंवा आकाशी निळ्या रंगाचा शर्ट. तसेच जांभळ्या रंगाच्या शर्टवर पांढर्या रंगाची पँट, तसेच हिरवा, जांभळा, गडद गुलाबी शर्ट देखील पांढर्या रंगाच्या पँटवर कॉम्बिनशन करू शकतो. न्यूट्रल कलर्स : न्यूट्रल कलर हा कोणत्याही रंगाबरोबर मॅच होऊ शकतो. तो कोणत्याच कॉम्बिनेशनला विरुद्ध वाटत नाही. या रंगाचे कपडे आपल्या वॉर्डरोबमध्ये असतील तर आपल्याला कलर कॉम्बिनशनमध्ये अडचणी येणार नाहीत. मूळात काळा, पांढरा, करडा, आकाशी निळा आणि विटकरी रंग न्यूट्रल रंग म्हणून ओळखले जाते. नेव्ही ब्ल्यू आणि ब्राऊन हे न्यूट्रल रंग नाहीत, मात्र फॅशनच्या दुनियेत या रंगाला नेहमीच प्राधान्य दिले गेले आहे.
Check Also
लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत
लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …
पांचजन्य वृत्तपत्र