लेख-समिक्षण

‌‘चांद मेरा दिल‌’चे पोस्टर रिलीज

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने आपल्या आगामी ‌’चांद मेरा दिल‌’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित केले असून, या माध्यमातून एका नव्या कोऱ्या जोडीची झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. अनन्या पांडे आणि अभिनेता लक्ष्य यांची ही जोडी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याने चित्रपटसृष्टीत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. धर्मा प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक सोनी करत आहेत.
हा चित्रपट पारंपारिक प्रेमकथांपेक्षा थोडा वेगळा आणि आधुनिक काळातील नात्यांमधील भावनिक चढ-उतार मांडणारा असेल, असे संकेत मिळत आहेत. निर्मात्यांनी या चित्रपटाला एक प्रखर संगीतप्रधान प्रेमकथा (इंटेन्स म्युझिकल लव्ह स्टोरी) म्हणून संबोधले आहे.
करण जोहरने नेहमीच बॉलिवूडला रोमँटिक चित्रपट दिले आहेत, परंतु ‌‘चांद मेरा दिल‌’ हा चित्रपट जुन्या पठडीतील चित्रपटांपेक्षा थोडा वेगळा, तरुण पिढीला भावणारे आणि वास्तववादी वाटत आहे. लक्ष्य आणि अनन्या ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.- किर्ती कदम

Check Also

‌‘लकडबग्घा-2‌’चा टीझर रिलीज

अभिनेता आणि दिग्दर्शक अंशुमन झा याने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‌’लकडबग्घा 2: द मंकी बिझनेस‌’ …