लेख-समिक्षण

रविवार विशेष

ऑपरेशन ‘आत्मघात ’

सिनेमात अनेक अतार्किक प्रसंग पाहायला मिळतात. किंबहुना तर्कसंगत नसल्यामुळंच ते अधिक मनोरंजक बनतात. अशा तर्कशून्यतेविषयी व. पु. काळे एका कथेत म्हणतात, ‘हिरोने आरशात बघून स्वतःच्या ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन केलं, असं जरी दाखवलं असतं तरी मी विश्वास ठेवला असता.’ आधीच वास्तवापासून दूर असलेल्या प्रसंगावर केलेली ही अतिशयोक्ती. म्हणजे वास्तवापासून आणखी दूर! परंतु आरशात बघून नव्हे, तर चक्क यू-ट्यूबवर बघून माणसं स्वतःचं …

Read More »

‘फुंकर’जखमेवर

तुटलेल्या प्लॅस्टिकच्या बादल्या किंवा फाटलेले रबर-प्लॅस्टिकचे बूट दुरुस्त करणारे लोक अगदी परवा-परवापर्यंत दिसत होते. रस्त्याकडेला बसून हे लोक प्लास्टिकच्या वस्तूला पडलेल्या भेगांमध्ये गरम प्लॅस्टिक भरून देत असत. अगदीच वाया जाण्याऐवजी ती वस्तू आणखी काही दिवस उपयोगाला येत असे. लोखंडी हत्यारं शेगडीत गरम करून प्लॅस्टिकचे तुकडे तापवले जात असत आणि त्या रसायनाने वस्तूच्या ‘जखमा’ भरल्या जात असत. कल्पना करा, हेच टेक्निक …

Read More »

चर्चेत ‘हंता’

एकाच दिवसात किंवा अवघ्या काही दिवसांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू होण्याच्या काही दुर्मिळ, मोजक्या घटना आपल्या पाहण्यात असतात. काहीजण या घटना दुर्दैवी मानतात तर काहीजण अशा घटनांमध्ये पती-पत्नीमधील घट्ट बंध शोधतात. अपघातात पती-पत्नीचा मृत्यू होण्याच्या घटना अनेक असतात; परंतु आजारपणामुळं किंवा कधी-कधी तर कोणताही आजार नसताना अशा घटना घडतात. पतीवर अंत्यसंस्कार करून लोक परत येईपर्यंत पत्नीचा मृत्यू झाल्याचीही उदाहरणं पाहायला मिळतात. …

Read More »

अनाकलनीय यंत्रभाषा

अखेर तो दिवस उजाडलाच. भीती व्यक्त होतच होती; पण ती दूर करण्याची जबाबदारी वेळेत स्वीकारली गेली नाही. घटना घडली चीनमध्ये. परंतु तिचे पडसाद उमटले संपूर्ण जगात. अवघ्या काही सेकंंदांचा व्हिडिओ भविष्यातील अघटिताची चाहूल देणारा ठरला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर संचालित यंत्रमानवांचा ‘परफॉर्मन्स’ सुरू होता. वेगवेगळ्या आकारांचे यंत्रमानव स्टेजवर आपापलं कौशल्य दाखवत होते. सभागृहातील लोक टाळ्या पिटत होते. स्टेजच्या खालच्या बाजूला प्रेक्षागृहात दोन …

Read More »

तंत्रज्ञान गुद्द्यांवर!

खेर तो दिवस उजाडलाच. भीती व्यक्त होतच होती; पण ती दूर करण्याची जबाबदारी वेळेत स्वीकारली गेली नाही. घटना घडली चीनमध्ये. परंतु तिचे पडसाद उमटले संपूर्ण जगात. अवघ्या काही सेकंंदांचा व्हिडिओ भविष्यातील अघटिताची चाहूल देणारा ठरला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर संचालित यंत्रमानवांचा ‘परफॉर्मन्स’ सुरू होता. वेगवेगळ्या आकारांचे यंत्रमानव स्टेजवर आपापलं कौशल्य दाखवत होते. सभागृहातील लोक टाळ्या पिटत होते. स्टेजच्या खालच्या बाजूला प्रेक्षागृहात दोन …

Read More »

शिणवठ्याचं चक्र

माणसाचं काम हलकं करण्यासाठी, त्याला अधिक सुख देण्यासाठी मशीन रोज ‘अपडेट’ होत राहिलं. आता तर मशीन माणसासारखंच जगू लागलंय. तरीसुद्धा माणसाला माणसासारखं का जगता येत नाहीये? मशीनचा माणूस होत असताना माणूस मशीनसारखा का होत चाललाय? अनेक माणसांचं काम एकच मशीन करतंय, तर माणसाचं काम डिप्रेशन येण्याइतकं का वाढतंय? त्याच्याकडून कधी आठवड्याला सत्तर तास तर कधी नव्वद तास कामाची अपेक्षा का …

Read More »

अमरपट्ट्याची विक्री

सर्वांत प्रगत आणि किफायतशीर चॅटबॉट कुणाचा, यावरून ओपन एआय आणि चीनचे डीपसीक यांच्यात संघर्ष सुरू असण्याच्या काळातसुद्धा मानवजातीच्या इतिहासातलं सर्वांत जुनं वास्तव बदललेलं नाही. ते म्हणजे, पृथ्वीच्या पाठीवरचं सगळ्यात गुंतागुंतीचं, आश्चर्यजनक आणि अमूल्य यंत्र म्हणजे मानवी शरीर. मानवी जीवनात प्रत्येक वस्तूला पर्याय देता येईल; पण मानवी शरीराला पर्याय नाही. हे यंत्र बिघडलं तर दुरुस्त होऊ शकतं; पण संपलं की त्याचं …

Read More »

अर्धा हिस्सा

नातीगोती वगैरे खरोखर अस्तित्वात असतात, की गरज ठरवून त्यानुसार जोडली जातात? एकत्र कुटुंबपद्धतीपासून ‘सेल्फ मॅरेज’ म्हणजे स्वतःशीच लग्न करण्याच्या अजब निर्णयापर्यंत बरीच स्थित्यंतरं आपण पाहिली. या प्रवासात माणसाला अधिकाधिक एकटं आणि आत्मकेंद्री होताना आपण पाहिलं. शहरांकडे होणार्‍या स्थलांतरांमुळं सुरुवातीच्या काळात या विभक्तपणाचा आपण ‘अपरिहार्यता’ म्हणून स्वीकार केला. मग जास्तीत जास्त आमदनी आणि कमीत कमी जबाबदारी असणार्‍या नवश्रीमंतांची नवी जीवनशैली म्हणून …

Read More »

खेळता-खेळता

लहान मुलं बर्‍याच वेळा दारामागं लपून मोठ्यानं ‘भॉ’ करतात आणि आपल्याला किंवा एकमेकांना घाबरवतात. आपल्याला माहीत असलं, तरी आपण घाबरल्याचं सोंग करतो. जेव्हा मुलं एकमेकांना घाबरवण्याचा खेळ खेळतात, तेव्हा बर्‍याचदा ही अनपेक्षित घटना असते. त्यामुळे पोरं खरोखर दचकतात. दचकणारा एखाद्या वेळी चिडतोही. परंतु या दचकण्याचा जास्तीत जास्त परिणाम काय? भांडणं, अबोला वगैरे. परंतु या अत्यंत साध्या खेळाचा शेवट एखाद्या लहानग्याच्या …

Read More »

भेदाभेद भ्रम

र्धेचा जमाना आहे. जोरात धावायचं आहे. पहिला येईल त्याला मोठी संधी आहे. मागे राहील त्याची बरबादी निश्चित आहे. शहरातला असो वा खेड्यातला, श्रीमंत असो वा गरीब, इंटरनॅशनल स्कूलमधला असो वा जिल्हा परिषदेच्या शाळेतला… स्पर्धा सर्वांसाठी एकच आहे. माध्यमिक शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण करायचं आणि उच्च शिक्षणासाठी पुन्हा प्रवेश परीक्षा द्यायची. चांगल्या गुणांनी पदवी संपादन करायची आणि लगेच स्पर्धा परीक्षा द्यायच्या. …

Read More »