मुलीसाठी वरसंशोधन करताना आपल्याकडे उत्पन्न आणि कुंडलीबरोबरच अनेक बाबी तपासल्या जातात. सगळ्यात पहिली बाब असते मुलाची उंची. मुलापेक्षा मुलगीच उंच असेल तर इतर बाबी जुळूनसुद्धा चर्चा पुढे सरकत नाही. सरासरीपेक्षा अधिक उंची असलेल्या मुलीच्या आईवडिलांना ‘हिचं कसं होणार?’ अशी चिंता लागून राहिलेली असते. जगभरात वेगवेगळ्या वंशांचे लोक राहतात आणि त्यांची सरासरी उंची कमी-अधिक असते. परंतु एका बाबतीत संपूर्ण मानवजात एकसारखी …
Read More »रविवार विशेष
बाटलीतलं भूत
भस्मासुराला वर देणं आत्मघातकी ठरतं, हे आपल्याला पुराणकथेमधून समजलेलं आहे. परंतु तरीही आधुनिक काळात आपण असंख्य भस्मासुर जन्माला घातले; पोसले. नव्या तंत्रज्ञानाला विरोध करणं म्हणजे मानवजातीच्या कल्याणाला विरोध करणं, ही आधुनिक अंधश्रद्धा थोडा वेळ दूर ठेवून विचार करून काही प्रश्न आता आपल्याला पडायलाच हवेत. त्यातील महत्त्वाचा प्रश्न असा, की आधुनिक तंत्रज्ञानाने खरोखर अखिल मानवजातीचं कल्याण होतंय की मूठभरांचं उखळ पांढरं …
Read More »दंड झाले उदंड
वाहतुकीचा एकही नियम कधीच मोडला नाही, अशी व्यक्ती शोधून सापडेल का? जाणूनबुजून नसेल; पण नकळत का होईना आपल्या हातून कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या नियमाचं उल्लंघन होतंच. आपल्यामुळं कुणाला त्रास होऊ नये, कुणाचं नुकसान होऊ नये, कुणाच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, असा विवेकी विचार प्रत्येकानं केला असता तर नियम आणि कायद्यांची गरजच उरली नसती. रस्त्यांवरच्या अपघातांत दरवर्षी किती …
Read More »अंतरिक्षातील पहारेकरी
‘घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लांपाशी,’ हे संत जनाबाईंचे शब्द आपल्या परिचयाचे आहेत. आधुनिक काळात या शब्दांची आठवण करून देतात ते आपण अवकाशात सोडलेले उपग्रह. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर, भूस्थिर कक्षेत काम करणारे हे उपग्रह आपल्या संरक्षणाच्या दृष्टीनं खूप मोलाची जबाबदारी पार पाडतात. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आणि तणाव आपण सध्या अनुभवतो आहोत. दहशतवाद्यांच्या तळांवर भारताने अचूक हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. शत्रूची …
Read More »‘झुकानेवाला’ आहेच!
झुकेगा नही…’ असं म्हणणार्या भल्याभल्यांना झुकवणारा कुणी ना कुणी असतोच. ‘मोडेन पण वाकणार नाही,’ असा बाणा असलेल्यांचा कणा कुणासमोर तरी लवचिक होतोच. सध्या आपापली बाजू त्वेषानं लावून धरण्याचे, त्यासाठी प्रसंगी एकमेकांना बोचकारण्याचे आणि मुख्यत्वे, हार न मानण्याचे दिवस आहेत. त्यामुळं कुणी कुणासमोर सहजासहजी झुकत नाही. ‘तुझं थोडं, माझं थोडं’ असं म्हणून हातात हात घालून पुढं जाण्याचं शहाणपण आपल्यातून नामशेष होईल …
Read More »बाळ एक,जन्म दोनदा!
एकाच जन्मात पुन्हा जन्माला येण्याची इच्छा कुणाला नसते? मुठीतून वाळू घसरत जावी, तसं आयुष्य हातातून निसटून जात असतं आणि योजलेल्या अनेक गोष्टी वेळच्या वेळी होत नाहीत. अनेक गोष्टी थोडक्यात हुकतात. कर्तृत्व असूनही यश हुलकावणी देत राहतं. अशा वेळी प्रत्येकाला वाटतं, आयुष्य पुन्हा पहिल्यापासून सुरू करता आलं तर..! परंतु आपण निसर्गनियमाच्या विरोधात जाऊ शकत नाही. मागे वळू शकत नाही आणि आहे …
Read More »नवा रंग
‘अगर रंग ना हो, तो कैसी बेरंग लगेगी ये दुनिया..!’ या शब्दांकडे फक्त प्रसिद्ध संवाद म्हणून न पाहता त्यात सांगितलेल्या परिस्थिती ची कल्पना करून पाहा. आपल्याला सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतं, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक रंगछटा पाहण्याची क्षमता आपल्याला लाभली आहे. कितीतरी रंगछटांची नावंही आपल्याला माहीत नसतात; पण त्या आपल्याला दिसत असतात. अशा अंदाजे एक दशलक्ष रंगछटा आपण पाहू शकतो; परंतु त्या सर्व …
Read More »परावलंबित्व नकोच!
‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी,’ अशी आपल्याकडे म्हण आहे. माणसाच्या ऐतखाऊ वृत्तीचं वर्णन या म्हणीतून केलं गेलंय. विनासायास एखादी गोष्ट मिळत असेल तर कुणाला नको असते? ‘अमक्याबरोबर तमकं फ्री’ अशा जाहिरातींची भुरळ आपल्याला पडतेच की! परंतु लोकांना एखादी गोष्ट मोफत देण्याच्या सरकारी योजनांवर मात्र कडाडून टीका होत असते. मध्यंतरीच्या काळात अर्थतज्ज्ञांनी अशा योजनांचा पंचनामा करणारं भरपूर लेखन केलं. परंतु …
Read More »तपासाची ‘दशा ’
एखादी व्यक्ती बेपत्ता होते. बरीच वर्षं तिचा शोध लागत नाही. अखेर ती या जगात नाही, असं सगळे मानू लागतात… आणि अनेक वर्षांनंतर ती व्यक्ती जिवंत असल्याचं समोर येतं. नाटक-सिनेमासाठी ही कथा ठीक आहे; पण प्रत्यक्षातही अशा काही घटना घडल्या आहेत. अर्थात, ज्याकाळी संपर्कमाध्यमं अत्यल्प होती, त्या काळात अशा घटना पाहायला मिळतात. विशेषतः युद्धावर गेलेला एखादा सैनिक बेपत्ता झाल्यास तो मरण …
Read More »संयम बेपत्ता
आपल्या आईसमोरच नवर्याला बदडणार्या बायकोचा व्हिडिओ पाहिलात? ‘मी अजमल कसाबचा भाऊ बोलतोय,’ असं सांगून पोलीस मुख्यालय उडवून देणार्या मद्यपी सुरक्षा रक्षकाची बातमी वाचलीत? हैदराबादजवळच्या अमीनपूरमध्ये स्वतःच्या तीन मुलांचा गळा दाबून खून करणार्या आईबद्दल तुम्हाला कळलंय? पत्नी मुलांना भेटू देत नाही, फोनवर बोलूही देत नाही म्हणून पाळण्याच्या दोरीनेच फास लावून घेणारा यवतमाळचा संदीप आडे तुम्हाला ठाऊक आहे? कोणत्याही दिवशीचं वर्तमानपत्र उघडा. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र