रुक्ष आणि निर्जीव केस: तुमचे केस कोरडे दिसत असतील, तर त्यांना खोलवर ओलावा देण्याची गरज असते. अशा केसांसाठी खोबरेल तेल किंवा आर्गन तेल सर्वोत्तम आहे. नारळ तेल प्रथिनांचा ऱ्हास रोखते, तर आर्गन तेलातील जीवनसत्व ‘ई’ केसांना चकाकी देते.
केस पातळ होणे आणि गळती : केस गळत असतील तर रक्ताभिसरण वाढवणे गरजेचे असते. अशा वेळी रोझमेरी तेल किंवा एरंडेल तेल वापरावे. रोझमेरी तेलामध्ये केस पुन्हा उगवण्याची क्षमता असते, तर एरंडेल तेलातील घटक मुळांना मजबुती देतात.
तेलकट स्काल्प आणि कोंडा : केस धुतल्यानंतर लगेच चिकट होत असतील, तर जड तेले लावणे टाळा. त्याऐवजी टी-ट्री तेल किंवा जोजोबा तेल वापरा. टी-ट्री तेलातील बुरशीविरोधी गुणधर्म कोंडा नष्ट करतात, तर जोजोबा तेल त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करते.
अकाली पांढरे होणारे केस: केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी भृंगराज तेल किंवा आवळा तेल उत्तम मानले जाते. हे तेल शिरोत्वचेला थंडावा देऊन केसांना पोषण देते.
तेल लावताना काय टाळावे?
जास्त तेल लावल्याने त्वचेची छिद्रे बंद होऊ शकतात आणि धूळ साचते. तेल रात्रभर डोक्यावर ठेवल्याने संसर्ग किंवा कोंडा वाढण्याची शक्यता असते. काही तीव्र तेले कधीही थेट लावू नका; ती नेहमी दुसऱ्या तेलात मिसळून लावा. डोक्याला जोरात घासून मालिश केल्याने मुळे कमकुवत होऊन केस अधिक गळू शकतात.
योग्य पद्धत ः तेल कोमट करून केसांच्या वेगवेगळ्या भागांत विभागून मुळांपर्यंत लावा. पाच ते दहा मिनिटे हलक्या हाताने वर्तुळाकार गतीने मालिश करा.अर्धा ते एक तास तेल केसांत राहू द्या आणि त्यानंतर सौम्य शाम्पूने धुवा. आठवड्यातून एक किंवा दोनदा तेल लावणे केसांच्या आरोग्यासाठी पुरेसे आहे.
Check Also
पावसाळ्यातील ॲक्सेसरीज निवडताना…
पावसाळा म्हणजे हिरवाई, गारवा आणि नवचैतन्याचा बहारदार ऋतू. मात्र या ऋतूसोबत अनेक अडचणीही येतात. अचानक …
पांचजन्य वृत्तपत्र