स्वयंपाकघरात असणारे मसाले फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसतात, तर आरोग्यासाठीही तेवढेच महत्त्वाचे असतात. असे अनेक मसाले आहेत, जे अनेक आजारांसाठी रामबाण उपाय ठरतात. गरम मसाल्यांमधील एक म्हणजे लवंग. गरम मसाल्यातील लवंग बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. लवंगेमुळे जेवणाची चव वाढते आणि आरोग्यासही लाभ मिळतात. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात. अमेरिकेतील एका प्रसिद्ध डॉक्टरने लवंग खाण्याचे फायदे सांगितले आहेत, जे जाणून घेतल्यास तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास किंवा लवंगेचे पाणी प्यायल्यास अपचन आणि पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होतील. लवंगेत अशा काही नैसर्गिक तत्त्वांचा समावेश आहे, ज्यामुळे तणाव कमी होऊन मेंदू शांत होण्यास मदत मिळते आणि झोप चांगली येईल. लवंगेतील औषधी गुणधर्मामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर सहजरीत्या फेकले जाण्यास मदत मिळेल. रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत मिळेल. लवंगेची प्रकृती उष्ण आहे आणि यातील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे घशातील खवखव, खोकला-सर्दी, कफच्या समस्येतून सुटका मिळेल.
रात्री झोपण्यापूर्वी लवंग चावून खाल्ल्यास तोंडाला येणारा दुर्गंध कमी होईल. तसेच तोंडाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. विशेषतः दात दुखीपासून आराम मिळू शकतो. लवंगेचे पाणी प्यायल्यास शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारेल आणि यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. लवंगेमधील अँटी-मायक्रोबिअल गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल.
तज्ज्ञ सांगतात, चार ते पाच लवंग एक कप पाण्यात उकळा. उकळ आल्यानंतर पाच मिनिटे गॅसच्या मध्यम आचेवर पाणी गरम करावे. गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे. लवंगेचे पाणी तयार झाल्यानंतर जवळपास एक तासानंतर पाणी प्यावे. झोपण्यापूर्वी 30 मिनिटे आधी लवंगेचे पाणी प्यावे. यामुळे काही दिवसांत शरीरामध्ये सकारात्मक बदल जाणवू लागतात. मात्र, मर्यादित स्वरूपातच लवंगेचे पाणी प्यावे.
Check Also
एक हत्यार…किंमत पाच अब्ज!
काळाच्या ओघात शस्त्रास्त्रांचेही स्वरूप बदलत गेले. आधुनिक काळात अनेक प्रकारची शस्त्रे व अस्त्रे पाहायला मिळतात. …
पांचजन्य वृत्तपत्र