मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे; पण तरीही अनेक जण त्याच्या आहारी जातात. पण, एका संशोधनानुसार असे आढळून आले आहे की, माणूसच नाही, तर प्राणीदेखील नशा करतात. आफ्रिकेच्या जंगलातील याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आफ्रिकेच्या जंगलातून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये जंगलातील प्राणी धुंद अवस्थेत पाहायला मिळाले. जंगलातील एका खास झाडाची फळे खाल्ल्यानंतर हे सर्व प्राणी नशेत टल्ली होतात, असे यात दिसून आले.
आफ्रिकेतील जंगलात आढळणाऱ्या मारुला वृक्षाची फळे खाऊन प्राण्यांना नशा होते. तिथे ही झाडे अगदी सहज आढळतात. याला दरवर्षी फळे येतात. ही फळे पुरेशी पिकल्यावर खाली पडू लागतात. जेव्हा जंगलातील प्राणी हे फळ खातात, तेव्हा हळूहळू त्यांना नशा चढते आणि सर्व धुंद असल्यासारखे वागू लागतात. याचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अनेक प्राणी झाडाची पिकलेली फळे खाताना दिसले. ते आरामात बसून फळे खात होते; मात्र काही वेळातच अनेकांना त्याची नशा झाली.
पोटभर फळे खाऊन जेव्हा ते चालण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना सरळ चालता येत नाही. यासोबतच एकदा पूर्ण नशेत गेल्यानंतर थेट दुसऱ्या दिवशी त्यांना जाग आली, त्यावेळी देखील ते बरेच सुस्तावलेले दिसून आले. सदर फळांमध्ये असा कोणता अर्क होता, यावर संशोधन सुरू आहे. मात्र, त्यापूर्वी हा व्हिडीओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आला आहे. नेटिझन्सनी यावर अनेक मतमतांतरे नोंदवली आहेत. काहींच्या मते फळांमध्ये प्राण्यांना गुंगवणारा एखादा अंश असू शकतो, तर काहींनी असे चित्र जंगलात सातत्याने दिसून येत असेल, असे म्हटले आहे.
Check Also
माऊंट एव्हरेस्टची उंची का वाढतेय?
ऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या शिखरांपैकी एव्हरेस्टची उंची समुद्रसपाटीपासून …
पांचजन्य वृत्तपत्र