प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूची आता ‘इनॅमर’ या नामांकित ब्रँडच्या नवीन मोहिमेसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. महिलांच्या फॅशन आणि अंतर्वस्त्र निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या कंपनीने तापसीसोबतच्या या नव्या सहकार्याची घोषणा केली आहे. या मोहिमेद्वारे महिलांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास आणि आधुनिकतेचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
तापसी पन्नू तिच्या धाडसी आणि हटके भूमिकांसाठी ओळखली जाते. ‘इनॅमर’च्या मते, तापसीचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या ब्रँडच्या मूल्यांशी तंतोतंत जुळणारे आहे. ही नवी मोहीम आधुनिक भारतीय महिलेच्या गरजा आणि तिच्या प्रगतीशील विचारांचे प्रतिनिधित्व करते. तापसीने देखील या ब्रँडशी जोडले गेल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
चित्रपटसृष्टीतील यशस्वी कारकीर्दीसोबतच तापसी आता जाहिरात क्षेत्रातही आपली पकड मजबूत करत आहे. मोठ्या ब्रँडसोबत तिचे जोडले जाणे हे तिच्या वाढत्या लोकप्रियतेचे प्रतीक मानले जात आहे. – किर्ती कदम
Check Also
रुपेरी पडद्यावरची विद्यार्थी आंदोलने
भारतीय लोकशाहीची खरी ताकद केवळ निवडणुकांमध्ये नाही, तर मतभिन्नता स्वीकारण्याच्या आणि शांततापूर्ण विरोधाला स्थान देण्याच्या …
पांचजन्य वृत्तपत्र