अरोग्यासाठी केळाचे सेवन आरोग्यदायी असते हे आपल्याला माहिती आहेच; पण केळफूलही आरोग्यदायी असते याची अनेकांना कल्पना नसते. केळीच्या फुलांमध्ये फायबर, प्रथिने, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस आणि व्हिटामिन ईसारखी खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. हे फूल कच्चे किंवा शिजवून, तसेच सूप, कोशिंबीर आणि तळूनदेखील खाल्ले जाऊ शकते. याशिवाय केळीच्या फुलाचा हेअर पॅक किंवा फेस पॅक म्हणूनही वापर करता येतो. अनेक महिलांना अशक्तपणाचा त्रास असतो. केळीची फुले लोहाचा चांगला स्रोत मानली जातात. याचे सेवन केल्याने हिमोग्लोबीनची वेगाने वाढ होते, असे तज्ज्ञ सांगतात. केळीच्या फुलांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. ज्याद्वारे शरीरातील साखरदेखील नियंत्रित केली जाते. अशा प्रकारे, हे फूल मधुमेह असलेल्या रुग्णांसाठीदेखील फायदेशीर आहे. केळीच्या फुलांमध्ये निराशाविरोधी अर्थात अँटिडिप्रेशन घटक असतात, जे मानसिक तणावापासून आपले संरक्षण करतात आणि आपला मूड सुधारण्यास मदत करतात. केळफुलात डाएटरी फायबर्स आणि व्हिटामिन ईसोबतच अँटिऑक्सिडंटस्देखील मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्सचा धोका कमी करण्यास मदत होते. परिणामी, कॅन्सरचा धोकादेखील मंदावतो.
Check Also
शून्यातून बनला कोट्याधीश…
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस यशाची कोणतीही शिखरं सर करू …
पांचजन्य वृत्तपत्र