लेख-समिक्षण

डिलीट झालेले व्हॉटसअ‍ॅप मेसेज पाहायचेत?

व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ या फीचरमुळे पाठवलेले संदेश डिलीट करण्याची सुविधा मिळते. त्यामुळे अनेकदा उत्सुकता निर्माण होते की हा संदेश नक्की काय होता. मात्र, काही खास पद्धतींच्या मदतीने तुम्ही हे डिलीट केलेले संदेश वाचू शकता.
1. नोटिफिकेशन हिस्ट्रीचा वापर
अँड्रॉइड 11 आणि त्यापुढील आवृत्त्यांमध्ये नोटिफिकेशन हिस्ट्री हे फीचर उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही डिलीट केलेले संदेश पाहू शकता. यासाठी: सेटिंग्समध्ये जा. अ‍ॅप्स आणि नोटिफिकेशन पर्याय निवडा. नोटिफिकेशन वर टॅप करा. नोटिफिकेशन हिस्ट्री पर्याय निवडून तो सक्रिय करा. यामुळे तुमच्या फोनमध्ये आलेले सर्व नोटिफिकेशन जतन होतील आणि तुम्ही डिलीट केलेले संदेशही पाहू शकता.
2. थर्ड-पार्टी अ‍ॅप्सचा वापर
जर तुमच्या फोनमध्ये नोटिफिकेशन हिस्ट्री फीचर उपलब्ध नसेल, तर तुम्ही काही थर्ड-पार्टी अ‍ॅप्सचा वापर करू शकता. उदाहरणार्थ, डब्ल्यूएएमआर अ‍ॅपचा उपयोग करून तुम्ही डिलीट केलेले संदेश पाहू शकता. यासाठी गूगल प्ले स्टोअर वर जाऊन डब्ल्यूएएमआर अ‍ॅप डाउनलोड करा आणि इंस्टॉल करा. आवश्यक परवानग्या द्या. अ‍ॅपमध्ये व्हॉट्सअ‍ॅप निवडा. यानंतर, डिलीट केलेले संदेश या अ‍ॅपमध्ये दिसतील.
3. व्हॉट्सअ‍ॅप वेब एक्सटेंशनचा वापर
जर तुम्ही कंप्युटरवर व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरत असाल, तर वा वेब प्लस यासारख्या एक्सटेंशनच्या मदतीने डिलीट केलेले संदेश पाहू शकता. यासाठी गूगलवर वा वेब प्लस शोधा आणि एक्सटेंशन इंस्टॉल करा. व्हॉट्सअ‍ॅप वेब उघडा आणि हे एक्सटेंशन सक्रिय करा. ‘रिस्टोर डिलीटेड मेसेज’ फीचर सुरू करा. यानंतर, तुम्ही डिलीट केलेले संदेश पुन्हा पाहू शकता.
4. आवश्यक खबरदारी
थर्ड-पार्टी अ‍ॅप्स वापरताना विशेष काळजी घ्या, कारण यामुळे तुमच्या डेटा सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. सबब फक्त विश्वसनीय अ‍ॅप्स आणि एक्सटेंशन्स वापरा. वरील पद्धतींच्या मदतीने तुम्ही डिलीट झालेले व्हॉट्सअ‍ॅप संदेश पुन्हा पाहू शकता. मात्र, डेटा सुरक्षेचा पूर्ण विचार करूनच या पर्यायांचा वापर करा.

Check Also

लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत

लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …