लेख-समिक्षण

पांडा पॅरेटिंग म्हणजे काय?

सर्व पालकांना त्यांच्या मुलांमध्ये स्वावलंबी होण्याची गुणवत्ता असावी असे वाटत असते. असे असले तरी बरेचदा मुलांचे संगोपन करताना पालकांकडून झालेल्या काही चुका मुलांचा आत्मविश्वास कमी करण्यास कारणीभूत ठरतात. परिणामी, भविष्यात मुलांना स्वतःशी संबंधित कोणताही निर्णय घेताना खूप संकोच वाटतो. याबाबत वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर आयुष्याच्या परीक्षेत ते इतर मुलांपेक्षा मागे पडू लागण्याची शक्यता असते.
• मुलांमधील हरवलेला आत्मविश्वास परत आणण्यासाठी आजकाल पांडा पॅरेंटिंग या संकल्पनेला खूप पसंती दिली जात आहे. यामुळे मुलांना केवळ आत्मविश्वास मिळत नाही तर पालकांशी असलेले मुलांचे नाते घट्ट ठेवण्यासही मदत होते.
• पांडा पेरेंटींगमध्ये मुलांचे संगोपन करताना पालक मुलांना केवळ शिस्त लावत नाहीत तर त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देतात. मात्र, हे करत असताना मुलांना गरज पडल्यास मदत करण्यासाठी पालक सदैव हजर असतात. पांडा पेरेंटिंगमुळे मुले मुलं त्यांच्या आयुष्यातील समस्या स्वतः सोडवायला शिकतात.
पांडा पालकत्वाचे फायदे
•लहानपणापासून आपला निर्णय आपणच घेण्याची क्षमता विकसित झाल्यामुळे जीवनात कोणतीही अडचण आली तरी मुले डगमगत नाहीत, अस्वस्थ होत नाहीत. कसोटीच्या प्रसंगी मुलांना चिडचिड आणि निराश वाटत नाही. त्याला स्वतःच्या भावना कशा हाताळायच्या याचे कसब अवगत असते.
•पालकत्वाच्या या शैलीदरम्यान, पालक मुलाला मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य देतात. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि इतरांशी बोलताना त्यांना संकोच वाटत नाही.
•बहुतेकदा पालक आपल्या मुलांना लहान समजतात आणि आपल्या इच्छा त्यांच्यावर लादतात. पांडा पेरेंटींगमध्ये ही बाब कटाक्षाने टाळली जाते. यामध्ये पालक मुलांना जीवन जगण्याचे स्वातंत्र्य देतात. त्यामुळे मूल आपल्या आई-वडिलांच्या अधिक जवळ येते आणि दोघांमधील नाते अधिक घट्ट होते.
• पांडा पालकत्वादरम्यान सेल्फ मोटिव्हेशनची प्रक्रिया पार पाडली जात असल्याने भविष्यात ही मुले मुले स्वतःची उद्दिष्टे, ध्येये स्वतः तयार करतात आणि ती साध्य करण्याची जबाबदारी घेतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी हे कौशल्य खूप परिणामकार ठरते.

Check Also

लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत

लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …