चौदा वर्षे हा वयोगट म्हणजे किशोरवयीन टप्पा. सधन कुटुंबातील मुलांसाठी तर हे वय खेळण्याचे आणि बागडण्याचे. पण या वयात कष्ट करणारी मुले वेळेचा सदुपयोग करतात आणि कालांतराने इतिहास घडवितात. हेच नामीबियाच्या 72 वर्षीय नेतुंबो यांनी करून दाखविले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे वेड उराशी बाळगत तरुणपणात चळवळीत सहभाग घेतला आणि श्वेतवर्णियांच्या तावडीतून देशाला मुक्तता मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. नेतुंबो यांनी खरोखरच इतिहास घडविला आहे. नामीबियाच्या इतिहासात नेतुबो या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या असून तत्पूर्वी त्या उपाध्यक्ष होत्या.
प्रत्येकाला आपले मूल लाडकेच वाटत असते. या भावनेपोटी प्रत्येकजण लाड करत असताना त्याचे प्रमाण जरा जास्तच होतात, याची जाणीवच राहात नाही. त्यासाठी थोडीशी नियमावली जर स्वत:लाच लावून घेतली तर मुले पालनपोषण उत्तमरितीने घडेल.
मुलांना स्वत:ची कामे करण्याची शिस्त लावणे महत्वाचे आहे. काही महिला मुलांना अतिलाडामुळे कामे करु देत नाहीत. त्यामुळे मुले आळशी होतात किंवा आई किंवा इतरांवर अवलंबून राहतात.
मुलांचे लाड करण्यासोबत त्यांना संस्कार व नैतिकतेचे पाठही आईने शिकवले पाहिजे. मुलगा स्वावलंबी बनावा यासाठी खालील महत्वपूर्ण गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे.
मुलांची कामे तुम्ही न करता त्यांना स्वत:ची कामे स्वत:च करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
मुलांमध्ये उत्साह निर्माण होईल, असे वातावरण निर्माण करावे. मुलांसमोर सकारात्मक बोलले पाहिजे. वारंवार नकारात्मक गोष्टी मुलांसमोर बोलल्याने त्यांची मानसिकताही नकारात्मक होऊन जाते.
मुलांमध्ये एखादी बदल्याची भावना निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे किंवा त्याच्यासमोर तशा गप्पा न मारणे योग्य.
मुलांना प्रेम, मैत्री, सद्भावना, देशप्रेम यांचे महत्व सांगितले पाहिजे.
मुलांना त्यांचा गृहपाठ स्वत:ला करु द्यावा.
मुलाची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यापेक्षा त्याला खर्या अर्थाने कोणत्या गोष्टीची गरज आहे, हे प्रथम ओळखले पाहिजे. आणि ही गरज फक्त आईच जवळची असल्याने ओळखू शकते.
मुलांना लहान पणाापासून बचतीची सवय लावली पाहिजे किंवा महत्व सांगितले पाहिजे.
कुटुंबातील संस्कार हे मुलांना त्यांच्या आईवडिलांकडूनच मिळतात. त्यामुळे मोठ्यांचा आदर राखणे, नमस्कार करणे, नम्र बोलणे आदी सवयी लहानपणाापासूनच लावल्या पाहिजे.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र