जक्षाला सापेक्षतावादाचा सिद्धांत देणारे महान संशोधक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी लिहिलेल्या एका पत्राचा नुकताच लिलाव करण्यात आला. या पत्राला तब्बल 33 कोटी रुपये किंमत मिळाली आहे. या पत्रात शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांनी काही वैज्ञानिक इशारे पुन्हा एकदा जगासमोर आणले होते. 1939 साली आईनस्टाईन यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती फ्रँकलिन डी रुजवेल्ट यांना लिहिले होते. यात त्यांनी अणुबॉम्ब आणि त्याचा शस्त्र म्हणून होणारा वापर याबाबत इशारा दिला होता. त्यानंतर दुसर्या महायुद्धातच अमेरिकेकडून जपानच्या दोन शहरांमध्ये हिरोशिमा आणि नागासकीमध्ये अणुबॉम्ब हल्ला केला होता.
आईनस्टाईन यांनी लिहिलेल्या पत्रात अमेरिकेच्या राष्ट्रपतींना सतर्क केले होते. त्यांनी म्हटले होते की, जर्मनी अणुबॉम्बचा शस्त्र म्हणून वापर करत आहेत. यावरून त्यांनी अमेरिका सरकारला सतर्कदेखील केले होते. पत्रात म्हटले गेले होते की, युरेनियमचा एक नवीन ऊर्जा स्रोतामध्ये संचार केला जाऊ शकतो, ज्याचा वापर अधिक शक्तिशाली विस्फोटक बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. सोबत, त्यांनी अमेरिका अणु फ्यूजनवर संशोधन आणि बॉम्ब विकसित करण्याचा सल्ला दिला होता. आईनस्टाईन यांच्या पत्राचा लिलाव क्रिस्टिज कंपनीने केला आहे. या कंपनीचे वरिष्ठ तज्ज्ञ पीटर क्लारनेट यांनी हे इतिहासातील सर्वात प्रभावशाली पत्र असल्याचे म्हटले होते. हे पत्र 1939 साली उन्हाळ्यात लिहिण्यात आलं होते, 2002 मध्ये मायक्रॉस्फॉटचे को फाऊंडर पॉल एलन यांनी 21 लाख डॉलरमध्ये तेव्हा खरेदी केले होते. यापूर्वी या पत्राचे मालक प्रकाशक मॅल्कम फॉर्ब्स होते. त्यांनी हंगेरीचे शास्त्रज्ञ लियो जिलार्डकडून ते मिळवले होते. आश्चर्य म्हणजे, हे पत्र जिलार्ड याने लिहिले होते. त्यावर आईनस्टाईन यांची स्वाक्षरी होती. दुसर्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने जपानच्या नागासकी आणि हिरोशिमावर अणुबॉम्ब हल्ला केला होता. त्यानंतर आईनस्टाईन यांनी अणुबॉम्बचा शस्त्र म्हणून झालेल्या वापरावर दुखः व्यक्त केले होते. अल्बर्ट आईनस्टाईन यांनी या अणुबॉम्ब हल्ल्याबाबत तीव्र दिलगिरी व्यक्त केली होती. दरम्यान अमेरिकेने करण्यात आलेल्या हल्ल्यात जवळपास 2 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतही कित्येक काळ त्याचे परिणाम या शहरांवर पाहायला मिळत आहेत.
Check Also
स्मार्टफोनच्या साथीने बनला कोट्यधीश
जिद्द, योग्य कल्पना आणि बदलत्या काळाची अचूक ओळख असेल तर यशासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते, …
पांचजन्य वृत्तपत्र