लेख-समिक्षण

जीन्स घालताय?

आपण बाजारातून जीन्स विकत घेतो. बरेचदा ती कंबरेत फिटींग असते पण उंचीला अधिक असते अशावेळी आपण तिला अल्टर करून घेतो. पण ही जीन्स अल्टर करण्याऐवजी तशीच राहून द्यावी. अशी जीन्स तीन वेगवेगळ्या प्रकारे आपण घालू शकतो.
त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे वरच्या बाजूने ती रोल करावी. तुम्ही जेव्हा एखाद्या शॉपिंगसाठी जात असाल किंवा मित्र-मैत्रीणींना भेटायला जात असाल अशावेळी जीन्स खालून दोन ते तीन वेळा वरच्या बाजूने फोल्ड करावी. ती केप्रीजसारखी दिसेल एवढी फोल्ड केली तरीसुद्धा चालू शकेल. यावर सँडल्स किंवा लोफर्स घातल्यास अधिक आकर्षक दिसेल.
आतल्या बाजूने वळवावे ः जीन्स अधिक फिटेड दिसावे असे वाटत असेल तर अँकलच्या बाजूने दुमडावी. अशा प्रकारच्या जीन्सवर आपण कुठल्याही प्रकारचे फूटवेअर घालू शकतो. म्हणजे यावर बॅलेट फ्लॅटपासून हाय हिल्सपर्यंत कुठलाही प्रकार घालता येतो. तिसरा प्रकार म्हणजे ती आहे तशीच राहू द्यावी. तुम्हाला जर थोडेसे वयस्क वाटावे असे वाटत असेल तर जीन्स आहे तशीच राहू द्यावी. फक्त पोटरीजवळ तिचे फिटींग व्यवस्थित आहे का, एवढे बघावे. जीन्सचे फिटींग चांगले असले म्हणजे ती टाचेमध्ये अडकेल, इतपत खाली येत नाही.

Check Also

लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत

लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …