अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या चित्रपटाचे अनेकांकडून कौतुकही करण्यात आले. मात्र आता हा चित्रपट एका परदेशातील चित्रपटाचा कॉपी असल्याचा दावा केला जात आहे.
बुर्का सिटी नावाच्या एका विदेशी चित्रपटावरून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. लापता लेडीज चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप करत नेटकर्यांनी किरण रावला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. ज्यामध्ये लापता लेडीजची कथा चोरल्याचं म्हटलं जात आहे.
रेडिट वर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टवरून हा चित्रपट बुर्का सिटी चा कॉपी असल्याचं म्हटलं आहे. सध्या रेडिटवर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये च्या 19 मिनिटांची एक शॉर्ट फिल्म बुर्का सिटी चा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
मिडल इस्टवर आधारित या चित्रपटात एक नवविवाहित पुरुषाची कथा आहे. ज्याच्या बायकोची बुरख्यामुळे आदला-बदली होते. त्यानंतर तो आपल्या बायकोला शोधण्यासाठी निघतो. त्यामुळेच अनेक नेटकर्यांना बुर्खा सिटीची कथा लापता लेडीज चित्रपटासारखी वाटतं आहे. दोघांमध्ये फरक एवढाचं आहे की, लापता लेडीजमध्ये घूंघट आहे आणि बुर्खा सिटीमध्ये बुर्खा आहे.
त्याशिवाय लापता लेडीजची कथा घूंघट के पट खोल चित्रपटाचीसारखी असल्याचं देखील अनेक नेटकरी म्हणत आहेत. 1999 मध्ये घूंघट के पट खोल चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याचं दिग्दर्शन अनंत महादेव यांनी केलं होतं. यासंदर्भात 2024मध्ये अनंत महादेवन यांनी पोस्टही केली होती.
यावरून आता नेटकरी किरण रावला ट्रोल करत आहेत. लापता लेडीज ओरिजनल नाही. तर हा चित्रपट दोन चित्रपटांचा कॉपी आहे, इतकं असताना हा चित्रपट ऑस्करला पाठवला होता. कमीत कमी जे ओरिजनल आहे ते तरी पाठवायचं. खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. हुबेहूब सीन्स कॉपी केले आहेत, असे म्हणत नेटकर्यांंनआय ट्रोल केले आहे.- विधिषा देशपांडे
दरम्यान, लापता लेडीज चित्रपट 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात पाठवण्यात आला होता. तसेच गेल्या महिन्यात पार पडलेल्या आयफा पुरस्कार 2025 मध्येही लापता लेडीज चित्रपटाने 10 पुरस्कार जिंकले होते.
Check Also
गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी
बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …
पांचजन्य वृत्तपत्र