लेख-समिक्षण

‘महावतार नरसिंम्हा कसा बनला?

जुलै महिन्यात रिलीज झालेल्या महावतार नरसिंह या अ‍ॅनिमेटेड सिनेमाने नवा इतिहास रचत बॉस ऑफिसवर धूमाकूळ घातला. कालच कुली आणि वॉर २ हे मोठे सिनेमे रिलीज झाले आहेत. मात्र, महावतार नरसिंह सिनेमाचे शो सुरू आहेत.
हा सिनेमा आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा अ‍ॅनिमेटेड सिनेमा ठरला आहे. पण सिनेमा तयार करण्यामागे घेण्यात आलेली मेहनत आणि आलेल्या संकटांना कशा पद्धतीने तोंड दिलं याविषयी या सिनेमाचे दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी थक्क करणारा प्रवास सांगितला आहे.
महावतार नरसिंह सिनेमा सर्वत्र गाजत आहे, पण जेव्हा सिनेमाचे दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी तो बनवण्यासाठी निर्मात्यांशी संपर्क साधला, तेव्हा कोणीही पैसे गुंतवण्यास तयार नव्हते, अशी आठवण त्यांनी सांगितली आहे. काही लोकांनी तर हा सिनेमा अ‍ॅनिमेशन आहे म्हणून दुर्लक्ष केलं. दोन ते तीन वर्षेसर्वत्र नकारघंटा मिळाली. पण अश्विन कुमार यांना हा सिनेमा बनवायचाच होता अशी खूनगाठ त्यांनी मनाशी बांधली आणि त्यादृष्टीने पाऊलं टाकायला सुरूवात केली. तेलुगू फिल्मनगरशी झालेल्या संभाषणात याबाबत अश्विन कुमार यांनी आठवण सांगितलं आहे. त्या काळात, मी अनेक लोकांकडे आर्थिक मदतीसाठी गेलो. अनेकांनी नाही म्हटले. पण मला हा सिनेमा बनवायचाच होता. आम्हाला या पौराणिक कथांवर आणि त्या सादर करण्याच्या पद्धतीवर विश्वास होता. अश्विन कुमार यांनी सांगितले की, लोक त्यांच्या अ‍ॅनिमेशन सिनेमाला मुलांचा कार्टून चित्रपट मानत होते. तर त्यांना सांगितंल की अ‍ॅनिमेशन फक्त मुलांसाठी नाही. ते म्हणाले, कोविडनंतर, आम्ही आमच्या कमी बजेट असणार्‍या सिनेमाच्या तयारीत गुंतलो. स्टुडिओतील काही लोकांना वाटू लागले की मी काहीतरी मोठे स्वप्न पाहिले असेल. एक स्वप्न जे माझ्या आवायाबाहेर होते. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होऊ लागला. काही महत्त्वाच्या लोकांनी अचानक साथ सोडली. नवीन लोकांना कामावर ठेवून सर्वकाही पुन्हा सुरुवात केली. सिनेमावर काम सुरू होते, पण क्रू मेंबरचे वेतन देणे कठीण होत होते. याविषयी देखील अश्निन कुमार यांनी कशा पद्धतीने या गोष्टीला सामोरे गेले याबद्दल सांगितलं आहे.
जेव्हा मला कुठूनही पैसे मिळत नव्हते, तेव्हा मी घर गहाण ठेवले. मी माझ्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले, कारण मला सर्वांना पगार द्यावा लागत होता. मी माझ्या आईवडिलांकडून, सासरच्यांकडूनही पैसे उधार घेतले. त्यांनी माझ्या वेडेपणावर विश्वास ठेवला आणि मला मदत केली. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. जेव्हा जेव्हा मला कोणतीही समस्या आली तेव्हा देवाने मला मार्ग दाखवला आणि योग्य लोकं त्यात सामील झाली. माझी पत्नी शिल्पा माझी शक्ती म्हणून माझ्यासोबत उभी राहिली, असं त्यांनी सांगितलं.
‘महावतार नरसिंहने जगभरात २१० कोटी रुपये कमावले आहेत. हा नवा रेकॉर्ड एका अ‍ॅनिमेडेट सिनेमाने रचला आहे. या टप्प्यावर पोहोचल्यावर ‘महावतार नरसिंह’ ने ‘स्पायडरमॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ (२०२३), ‘इंक्रेडिबल्स २’ (२०१८) आणि ‘हनुमान’ (२००५) सारख्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. अजूनही महावतार नरसिंह सिनेमा थिएटरमध्ये सुरू आहे. – राकेश माने

Check Also

गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी

बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …