लेख-समिक्षण

‘टीम गोल्स ’ का महत्त्वाची?

आजच्या स्पर्धात्मक व्यावसायिक जगात, संघ किंवा टीम म्हणून उद्दिष्टे ठरवणे हे यश मिळवण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. जेव्हा एखादी टीम एकत्रित गोल्स ठरवते, तेव्हा प्रत्येक सदस्य ठराविक दिशेने काम करतो आणि संघटनेच्या यशाला वेग येतो.
टीम गोल्स म्हणजे संपूर्ण गटाने मिळून गाठावयाची उद्दिष्टे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपली भूमिका आणि जबाबदारी स्पष्ट असते, त्यामुळे टीम अधिक कार्यक्षम होते.
संघटित उद्दिष्टे ठरवल्याने प्रत्येकाचा प्रयत्न कंपनीच्या मुख्य उद्दिष्टांशी जोडला जातो. संघाला एकत्र काम करण्याची दिशा मिळते. संवाद आणि सहकार्य सुधारते. टीम अधिक प्रेरित आणि कार्यक्षम होते.
टीम लक्ष्य कसे ठरवायचे?
र्ी टीमचे उद्दिष्ट नेहमी कंपनीच्या मोठ्या उद्दिष्टांशी संरेखित असावे.
र्ी कंपनीच्या धोरणांचा आढावा घ्या.
र्ी कोणते निकाल महत्त्वाचे आहेत हे ठरवा.
र्ी मोठ्या उद्दिष्टांचे छोटे टप्पे बनवा.
‘स्मार्ट’ नियम वापरा
स्मार्ट नियमाने योग्य लक्ष्य ठरवता येतात.
स्पेसिफिक ः उद्दिष्ट नेमके काय आहे ते ठरवा.
मेजरेबल ः प्रगती कशी मोजणार हे ठरवा.
अचिव्हेबल ः वास्तविक आणि शक्य असलेले उद्दिष्ट ठेवा.
रिलेव्हन्ट ः उद्दिष्ट कंपनीच्या योजनेस उपयुक्त हवे.
टाईमबाऊंड ः स्पष्ट मुदत ठरवा.
ठोस कृती आराखडा तयार करा
र्ीटीम गोल्स ठरवताना मोठ्या उद्दिष्टांचे छोटे टप्पे ठरवा. जबाबदार्‍या वाटून द्या. वेळापत्रक तयार करा. आवश्यक साधने आणि मदतीची व्यवस्था ठेवा. केवळ काम वाटून न देता, सदस्यांना स्वतः निर्णय घेऊ द्या. यामुळे त्यांचा सहभाग आणि जबाबदारी वाढते. नवीन कल्पना मिळतात. कामात अधिक उत्साह येतो.
र्ीटीमला उद्दिष्ट गाठण्यासाठी व्यवस्थापनाने पाठिंबा द्यावा. आवश्यक साधने आणि मार्गदर्शन द्या. अडचणी सोडवण्यासाठी मदत करा. चांगल्या कामाचे कौतुक करा.
र्ीयाखेरीज ठराविक कालावधीत आढावा बैठक घ्या. कार्यक्षमतेचे मोजमाप करा. आवश्यकतेनुसार सुधारणा करा.
टीम लक्ष्य निर्धारणाचे फायदे
र्ी कामकाज अधिक कार्यक्षम होते.
र्ीसंघटनात्मक उद्दिष्टे लवकर साध्य होतात.
र्ीसंवाद आणि सहकार्य सुधारते.
र्ीटीमचे मनोबल आणि प्रेरणा वाढते.
संघटनात्मक अडचणी आणि उपाय
र्ी संवादातील अडथळे असल्यास स्पष्ट सूचना द्या आणि योग्य तंत्रज्ञान वापरा.
र्ीकर्मचारी आणि कंपनीच्या गरजा समतोल ठेवा. बदलांचा उद्देश समजावून द्या आणि टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करा.
र्ीसंघटित लक्ष्य ठरवल्याने कंपनीची वाटचाल ठराविक दिशेने होते. योग्य नियोजन आणि सहकार्याने, टीम एकत्रितपणे उत्तम निकाल देऊ शकते.

Check Also

लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत

लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …