राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती, उद्योग यानंतर शिक्षण हा एक महत्त्वाचा गाभा घटक असतो. कुठल्याही राष्ट्राचे भवितव्य हे त्या देशात शिक्षणावर होणार्या गुंतवणुकीवर अवलंबून असते. अलीकडच्या काळात 1995 नंतर जागतिक स्तरावर अर्थशास्रज्ञ शिक्षणाला शाश्वत विकासाचे एक साधन मानत आहेत आणि जगभरात शिक्षणाकडे याच दृष्टीने पाहिले जात आहे. कारण शिक्षण आणि कौशल्य विकासावर राष्ट्राची प्रगती अवलंबून असते. संशोधन आणि विकास हाच खरा अर्थव्यवस्थेचा …
Read More »संपादकीय
होम डिलिव्हरी
पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज कमी-जास्त (कमी कमीच; जास्तच जास्त) करण्याची स्कीम सुरुवातीला दोनच राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवली गेली होती. त्यात ‘प्रयोग’ नेमका कोणता होता आणि तो यशस्वी झाला की नाही, याची माहिती मिळण्याआधीच ही स्कीम देशभर लागू झाली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ताज्या योजनांमुळं महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी किंवा भाऊ खूश झालेत की नाही, हे कळायला ऑक्टोबर-नोव्हेंबर उजाडावा लागेल. पण …
Read More »स्थानिक भाषांचा अवलंब गरजेचाच
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी अलीकडेच एका महत्त्वाच्या मुद्दयाकडे देशाचे लक्ष वेधले आहे. प्रभावी न्यायव्यवस्थेसाठी स्थानिक भाषांचा अवलंब केला पाहिजे असे वक्तव्य यांनी केले आहे. एका चर्चासत्रादरम्यान बोलातना न्या. चंद्रचूड यांनी सांगितले की, अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश असताना त्यांना हे जाणवले होते की वकील त्यांच्या मातृभाषेत अधिक चांगल्या प्रकारे युक्तिवाद करू शकतात. वास्तविक पाहता, आपल्या देशात व्यावसायिक …
Read More »विचित्र वास्तव
णूस जास्तीत जास्त किती वर्षेजगू शकतो? शतायुषी व्यक्ती अतिभाग्यवान मानली जाते. अर्थात, आपण किती जगतो यापेक्षा कसे जगतो हे अधिक महत्त्वाचं असतं. आपण सामाजिक नीतिनियम मोडले तर तो गुन्हा ठरतो आणि गांभीर्यानुसार त्याची शिक्षाही मिळते. गुन्हा अतिगंभीर असेल तर आजीवन कारावासाची शिक्षा मिळते. अशी व्यक्ती शतायुषी झाल्यास ती भाग्यवान नव्हे तर शापित ठरेल. हा विचार मनात येण्याचं कारण अॅडम ब्रिटन …
Read More »आव्हान भूजलाचे
देशभरात भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याबद्दल अनेक दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती अशी आहे की देशातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचीही गरज भागवणे कठीण होत आहे. मात्र या आव्हानाला तोंड देण्याच्या नावाखाली आजपर्यंत कोणताही ठोस उपक्रम होताना दिसत नाही. आता गांधीनगरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने केलेल्या एका नवीन अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, 2002 ते 2021 पर्यंत सुमारे 450 …
Read More »निर्जीवाचा जीव
हॉटेलात मिळतात तसे खमंग पदार्थ घरच्या किचनमध्ये शिजावेत असं वाटणं आणि ‘घरच्यासारखं जेवण’ मिळणारं हॉटेल शोधत फिरणं, ही विसंगती मजेशीरच नव्हे तर प्रातिनिधिक आहे. याच विसंगतीने माणसाला यंत्र आणि यंत्राला माणूस बनवलं. भांड्यावर नाव टाकायच्या यंत्रासारखा आवाज काढून बोलणार्या रोबोंचा जमाना मागे पडला आणि हुबेहूब माणसासारखे दिसणारे, बोलणारे, विचार करणारे ‘एआय ह्यूमनॉइड्स’ आपल्या दिमतीला हजर झाले. माणसाचं काम हलकं करण्यार्या …
Read More »अभिभाषणातील उणे-अधिक
मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या संयुक्त सत्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणात देशाला अपेक्षित असणारी सर्वंकष भूमिका किंवा धाडसी धोरणाचा अभाव दिसल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. वास्तविक या अभिभाषणात संयम, संतुलन आणि धोरण आखणीतील सातत्य होते. अर्थात, निवडणुकीचे वर्ष असल्याने गेल्या सहा महिन्यांत सरकारच्या आर्थिक आणि प्रशासकीय हालचाली मंदच राहिल्या. अनेक मोठे निर्णय बाजूला राहिले आणि आर्थिक सुधारणांना पुढील टप्प्याची …
Read More »अज्ञानाचे बळी
निसर्गावर विजय वगैरे मिळवणं आपल्याला कधीच शक्य नसतं आणि त्याची गरजही नसते; पण कथित आर्थिक विकासाच्या कैफात आपल्याला तसं पदोपदी वाटू लागलंय, हे मात्र खरं. निसर्ग हा सातत्यानं आपल्याला काही ना काही देत राहतो आणि आपण सातत्यानं त्याला ओरबाडत राहतो. त्यामुळं एकीकडे पैसा फुगत चाललाय आणि दुसरीकडे निसर्ग जखमी होत चाललाय. खिसे फुगल्यामुळं पर्यटनाचा पूर आलाय; पण पर्यटन कशाला म्हणायचं, …
Read More »टोलआकारणी आणि रस्त्यांची गुणवत्ता
दर्जेदार सेवा न देता कोणताही कर आकारणे हा ग्राहकांवर उघडपणाने केलेला अन्याय मानला जातो. हे तत्व प्रत्येक सरकारी आणि खाजगी विभागाला लागू होते. मात्र प्रत्यक्षात तसे न घडल्यामुळे नागरीक लोकअदालतीचे दरवाजे ठोठावत राहतात. हे सर्वशुत असले तरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चेला अधिकच उधाण आले आहे. नितीन गडकरी यांनी अधिकार्यांना खडे बोल सुनावले …
Read More »नाव बदलला!
हिमालयात वगैरे जाण्याची पैज लावली जाते; पण ज्या नावात आपला जीव अडकलेला असतो, ते बदलण्याची पैज लावणारा आणि मुख्य म्हणजे पाळणारा नेता आंध्र प्रदेशात नुकताच पाहायला मिळाला. राज्याचे माजी मंत्री आणि वायआरएस काँग्रेसचे नेते मुद्रगदा पद्मनाभम यांनी हा विक्रम त्यांच्या ‘नावावर’ केलाय. आंध्र प्रदेशच्या राजकारणात बरीच उलथापालथ नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाहायला मिळाली. चंद्राबाबू नायडूंच्या यशाबरोबरच जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र