लेख-समिक्षण

लोकप्रियता हिरव्या बांगड्यांची

बांगड्या हा सौभाग्याचा महत्त्वाचा अलंकार आहे. कालोघात तो फॅशनचाही अविभाज्य भाग बनला. बांगड्यांमध्ये आजमितीला असंख्य व्हरायटी बाजारात पाहायला मिळते. पण तरीही आजच्या आधुनिक युगातही सुवासिनींकडून हिरव्या बांगड्यांना अधिक पसंती दिली जाते. विशेषतः सणासुदीला तरुणी-महिला आवर्जून हिरव्या बांगड्या भरतात. श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा असून या महिन्यात हिरव्या बांगड्यांचं मोठं महत्त्व आहे. हिरवा रंग हा सृष्टीचे प्रतीक असून श्र्ावण महिन्यात वर्षा ऋतू सुरू असल्याने या महिन्यात निसर्ग अधिक हिरवागार झालेला असतो. सृष्टीला आणि दृष्टीला हा हिरवा रंग आनंद देतो. उत्तर भारतात तृतीयेपासून दोलोत्सव सुरु होतो. हा दोलोत्सव पार्वती देवीचा उत्सव मानला जातो. या उत्सवात पार्वतीला निसर्गातील फुलं, फळं आणि पानं यांच्या साहाय्यानं सजवलं जातं. तिला झोपाळ्यावर बसवून झोका दिला जातो. त्यालाच दोलोत्सव असे म्हणतात. यावेळी सौभाग्याचे लक्षण म्हणून हिरव्या बांगड्या भरल्या जातात. कोकणात देखील तृतीयेला गौरीची पूजा केली जाते. हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक मानला जातो. बुधाचा खडा म्हणून प्रचलित असणारा पाचू देखील हिरव्या रंगाचा असतो. हा रंग सुखदायी असल्याचे मानले जाते. काच ही वाळूपासून बनवली जाते. वाळू हे हे एक सृष्टीतील प्रतिक आहे. त्यामुळे काचेच्या बांगड्यांचे महत्त्व अधिक आहे. बांगड्या घातल्यानंतर त्यांच्या हालचालीमुळे आणि किणकिणाऱ्या त्यांच्या नादामुळे वातावरणात सकारात्मकता राहते, अशी धारणा आहे. स्त्रियांच्या कोमल हाताला बांगड्यांमुळे भारदस्तपणा येतो असे सांगितले जाते.

Check Also

उद्योजक बनणाऱ्या तरुणांसाठी…

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात. मात्र, कल्पना असणे आणि ती यशस्वी उद्योगात …