कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांच्या नेतृत्त्वात संसद भवनावर 20 जुलैला काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच आंदोलनकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी झालेल्या दगडफफेकीत काही आंदोलक आणि पोलीस जखमी झाले. या आंदोलकांनी जंतरमंतरवरून संसद भवनाकडे कूच करताना जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर राजधानी दिल्लीत जंतरमंतरवर सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनात पुन्हा एकदा 22 तारखेला मोठा गोंधळ निर्माण झाला. पोलिस आणि आंदोलक बुधवारी रात्री आमने-सामने आले. यावेळी पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. तसेच त्यांच्या दिशेने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
युवक मोठ्या प्रमाणात संसदेच्या दिशेने निघाल्यामुळे संसद भवनाचे गेट पूर्णपणे बंद करण्यात आले. याठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता आणि जवान बंदुका रोखून सज्ज होते. आंदोलकांनी बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय पाणी फवारणारी यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे. ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटीवरून कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) मागील 25 दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन पुकारले आहे. शास्त्रज़ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 18 दिवसांच्या उपोषणानंतर पोलिसांनी जबरदस्तीने उचलून सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, वांगचुक यांनी रुग्णालयात उपचार घेण्यास नकार दिला. वांगचुक यांच्या जागेवर सीजेपीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांनी उपोषण सुरू केले. सीजेपीने पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी ‘चलो संसद मार्च’ची हाक दिली होती. कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलक संसद भवनाजवळ पोहोचले. तेथे दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच लाठीचार्ज केल्यामुळे त्याठिकाणची परिस्थिती थोडी गोंधळाची निर्माण झाली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. या आंदोलकांनी कॅनॉट प्लेससह अनेक ठिकाणी तोडफफोड केली. एवढेच नाही तर, पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. पालिका बाजार आणि सेंट्रल पार्क भागात हजारोच्या संख्येने आंदोलकांनी निदर्शने केली. दरम्यान काहींनी पोलिसांनाच लक्ष्य केले आणि अचानक दगडफेक करायला सुरुवात केली आणि वाहनांची तोड-फोड केली.
यानंतर, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनीही बळाचा वापर केला आणि आंदोलकांना पांगवले. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. संसद भवनाचे मुख्य प्रवेशद्वार पोलिसांनी बंद केले. संसद भवनाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर आंदोलकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे या आंदोलनावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली. प्रचंड गर्दी लक्षात घेता, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) राजीव चौक, पटेल चौक आणि जनपथसह अनेक मेट्रो स्थानके तात्पुरती बंद केली. जंतरमंतर येथील आंदोलकांची संख्या 10,000 वर पोहोचल्याने पोलिसांना अतिरिक्त दल तैनात करावे लागले. आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष उफाळून आला, ज्यामुळे केरळ हाऊस लेनच्या दिशेने जाणाऱ्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सकाळी 11 वाजताच्या सुमारास पोलिस आणि आरएएफने लाठीचार्ज केला.
कॉक्रोच जनता पार्टीचे केंद्र सरकारविरोधातील हे आंदोलन अधिकच तीव्र झालेले असतानाच कॉक्रोज जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके यांनी उपोषण सोडले. तसेच सोनम वांगचूक यांना ताब्यात घेतल्यापासून सुरू केलेले उपोषण मागे घेतले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोज जनता पार्टीने राजधानी दिल्लीत सुरू केलेले आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. तसेच आंदोलकांकडून संसदेवर मोर्चाही काढला. दरम्यान, केंद्र सरकारविरोधातील हे आंदोलन अधिकच तीव्र झालेले असतानाच कॉक्रोज जनता पाटीर्चे प्रमुख अभिजित दीपके यांनी उपोषण मागे घेतले.
जंतर मंतरवर बुधवारी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना हात लावल्यास महाराष्ट्रातील मराठा दिल्लीत येतील, असा इशारा दिला. तसेच माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री महादेवराव जानकर यांच्या इतर मोठ्या नेत्यांनीही जंतरमंतरवरील आंदोलनाला भेट देऊन चर्चा केली. . पोलीस आणि आंदोलक पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे, यावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला, तसेच आश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर कॉकरोज जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास आंदोलक आणि पोलिस आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले. आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला, त्यानंतर या ठिकाणी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे, तसेच आश्रुधुराच्या नकळांड्यादेखील फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले तणावाचं वातावरण निर्माण झालं, त्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा करण्यात आला होता, आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. या घटनेत अनेक आंदोलक विद्यार्थी जखमी झाले होते. त्यानंतर संपूर्ण देशभरात वातावरण चांगलंच तापले. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत आहे, दिल्लीत तर आंदोलन सुरूच आहे, मात्र आता विविध राज्यांमधील अनेक शहरांमध्येदेखील या आंदोलनाला पाठिंबा म्हणून विद्यार्थी आंदोलन करत असल्याचे पहायला मिळत आहे.
Check Also
बँकिगमधील करिअरचा स्वप्नभंग
देशातील आघाडीच्या बँकांमध्ये सध्या एक मूक क्रांती आणि तितकीच मोठी पडझड सुरू आहे. ग्राहक सेवा …
पांचजन्य वृत्तपत्र