लेख-समिक्षण

लग्नानंतर गोविंदाची अनेक अफेअर्स ः सुनीता

अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा हिने नुकत्याच सुरू झालेल्या ‌’लॉक अप: सच या सझा‌’ (सीझन 2) या रिॲलिटी शोच्या प्रीमियरमध्ये आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे केले आहेत. शोचे सूत्रसंचालन करणाऱ्या फराह खान आणि रितेश देशमुख यांच्यासमोर सुनिताने खुलेपणाने कबुली दिली की, लग्नानंतर गोविंद्याचे अनेक महिलांसोबत प्रेमसंबंध (अफेअर्स) होते.
प्रीमियर दरम्यान फराह खानने सुनिता आहुजाशी संबंधित जुन्या हेडलाईन्स वाचून दाखवल्या. त्यातील मला गोविंदासारखा मुलगा हवा आहे, नवरा नको या विधानाचा संदर्भ देत सुनिताला स्पष्टीकरण विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना सुनिता म्हणाली, प्रेमामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट सहन करावी लागते. ‌‘चिची‌’ने (गोविंद्याचे टोपणनाव) आयुष्यात अनेक अफेअर्स केले. नायक आणि नायिकांमध्ये अशा गोष्टी घडतच असतात. इतकी वर्षेमी त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिले, त्यामुळे मला असे वाटते की पुढच्या जन्मात मला त्याच्यासारखा मुलगा मिळावा. नात्यात तिसरी व्यक्ती आल्यावर परिस्थिती कशी बिघडते, यावरही तिने भाष्य केले. याशिवाय, रितेश देशमुखने वाचलेल्या एका हेडलाईनवर टिप्पणी करताना सुनिताने गोविंद्याच्या पायाला गोळी लागण्याच्या जुन्या घटनेचा गमतीशीर संदर्भ घेतला. ती म्हणाली, चिची, जर तू ऐकत असशील तर नीट ऐकून घे, जेव्हा आयुष्यात कोणीतरी तिसरं येतं, तेव्हाच गुडघ्यावर गोळी लागते. या घटनेच्या वेळी स्वतःवर झालेल्या आरोपांचे खंडन करताना ती म्हणाली की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती मुंबईत नव्हती, तर खाटू श्यामच्या दर्शनासाठी गेली होती.- जगदीश काळे

Check Also

ट्रेलरने वाढवली उत्सुकता

‌‘धमाल 4‌’या बहुप्रतिक्षित विनोदी चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना पुन्हा एकदा हास्याचा मनोरंजक …