लेख-समिक्षण

कलरींग केल्यानंतरही केस पांढरे दिसताहेत ?

केसांना कलर केल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच मुळाशी पांढरे केस दिसू लागतात. अशा वेळी पुन्हा पूर्ण केसांना कलर केल्यास केसांचा पोत आणि आधीचा रंग खराब होऊ शकतो. केवळ मुळापाशी आलेला पांढरेपणा प्रभावीपणे कसा घालवायचा?
रुट टचअपसाठी रंगाचे मिश्र्ण तयार करताना प्रमाण अत्यंत महत्त्वाचे असते. तज्ज्ञांच्या मते, यासाठी 1:1.3 (एक जसे दीडच्या जवळ) हे गुणोत्तर वापरावे. कलर: 20 ग्राम आणि डेव्हलपर: 30 ग्राम हे दोन्ही घटक एकत्र करून व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्यावे.
जेव्हा तुम्ही केसांच्या मुळांना टच-अप करता, तेव्हा केवळ ज्या भागातील केस पांढरे झाले आहेत, तितक्याच भागावर ब्रशने कलर लावावा. रंगाचा हात पूर्ण केसांवरून फिरवला, तर मुळांकडील रंग योग्य दिसेल, पण खालच्या बाजूला जिथे आधीच रंग आहे, तिथे केस अधिक गडद आणि विसंगत दिसू लागतील. त्यामुळे रंगाचा समतोल राखण्यासाठी केवळ पांढऱ्या भागावरच लक्ष केंद्रित करा.
मुळांपर्यंत रंग नीट पोहोचण्यासाठी ‌‘टेल कॉम्ब‌’च्या (बारीक दांड्याचा कंगवा) साहाय्याने केसांचे लहान-लहान भाग (सेक्शन्स) करा. यामुळे डोक्याच्या प्रत्येक कोपऱ्यातील पांढरी झालेली मुळे व्यवस्थित झाकली . जातील. या पद्धतीमुळे तुमचा वेळ वाचतो आणि वारंवार पूर्ण केस . रंगवण्याची कटकटही उरत नाही.
तुम्हाला तातडीने बाहेर जायचे असेल आणि कलर लावण्यास वेळ नसेल, तर काही उत्पादने उपयुक्त ठरू शकतात:
हेअर कलर स्टिक: लिपस्टिकप्रमाणे असणारी ही स्टिक पांढऱ्या केसांवर सहज फिरवता येते.
हेअर पावडर: मुळांकडील पांढरे केस आणि विरळ झालेली जागा भरून काढण्यासाठी याचा वापर होतो. कलर कोम्ब स्टिक: कंगवा आणि कलर स्टिक अशा दोन सुविधा असलेल्या या साधनामुळे रंग लावणे सोपे जाते.

Check Also

संरक्षणदलातील आधुनिक करिअरसंधी

लष्करी रणनीती आणि युद्धपद्धतीचे पारंपारिक स्वरूप आता पूर्णपणे बदलले असून, आधुनिक संरक्षण क्षेत्र हे केवळ …