मेकअप हा चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालणारा भाग मानला जातो, परंतु अनेकदा मेकअप करताना केलेल्या चुका आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. विशेषतः डोळ्यांच्या मेकअपमध्ये झालेल्या चुका गंभीर परिणाम घडवू शकतात. यामुळे त्याचे दुष्परिणाम अधिक प्रमाणात दिसू लागले आहेत. डोळ्यांत जळजळ होणे, डोळे लालसर होणे, पाणी येणे, पापण्यांच्या मुळाशी कामट्या साचणे, आयलाइनर लावताच पाणी येणे किंवा आयशॅडोचे कण डोळ्यांत जाणे या समस्या चुकीच्या आय मेकअप मुळे होऊ शकतात. या गोष्टी डोळ्यांना गंभीर हानी पोहोचवू शकतात. म्हणूनच आय मेकअप करताना काही महत्त्वाच्या बाबींचे पालन करणे आवश्यक आहे.
©सर्वात मोठी चूक म्हणजे डोळ्यांवर मेकअप लावून झोपणे. असे केल्याने रोमछिद्रे बंद होतात. त्यामुळे डोळ्यांभोवती सूज येते. आयलाइनर लावून झोपल्यास डोळ्यांतील नाजूक टिशूज खराब होण्याचा धोका असतो. कारण आयलाईनरमधील पिग्मेंट वॉटर लाईनमध्ये ढकलले जाते आणि त्याचे सूक्ष्म कण डोळ्यांच्या टिअर फिल्ममध्ये मिसळतात.
तसेच इतरांनी वापरलेले किंवा अस्वच्छ ब्रश व स्पंज वापरल्याने बॅक्टेरिया व फंगसचा धोका वाढतो आणि कंजेक्टिव्हायटीस होण्याची शक्यता निर्माण होते. कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्या व्यक्तींनी डोळ्यांवर ऑयली किंवा वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्ट वापरू नयेत. फक्त लेन्स वापरणाऱ्यांसाठी सुरक्षित प्रॉडक्ट निवडणे आवश्यक आहे.
©चालत्या वाहनात आय मेकअप करणेही धोकादायक ठरते. अशा वेळी ब्रश किंवा बोट कॉर्नियावर लागू शकते, जे डोळ्यांसाठी गंभीर धोका ठरतो.
डोळ्यांना मेकअपमुळे होणाऱ्या हानीपासून वाचवण्यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे.
©दर तीन ते सहा महिन्यांनी डोळ्यांसाठी वापरले जाणारे मेकअप प्रॉडक्ट बदलले पाहिजेत.
©डर्मेटॉलॉजिस्ट आणि नेत्रतज्ज्ञांनी मान्यता दिलेले व तपासलेले प्रॉडक्टच वापरावेत. रात्री झोपण्यापूर्वी हलक्या व सुरक्षित रिमूव्हरने डोळ्यांवरील संपूर्ण मेकअप काढावा. मेकअप करण्याआधी हात व्यवस्थित धुवावेत. ब्रश किंवा प्रॉडक्ट इतरांबरोबर शेअर करू नयेत आणि त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.
©मेकअप प्रॉडक्ट खरेदी करताना लेबल नीट वाचावे, ब्रश धुवावेत आणि मुदत संपलेले मस्कारा किंवा इतर साहित्य त्वरित फेकून द्यावे. या छोट्या उपायांनी डोळे सुरक्षित, निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यास मोठी मदत मिळते.
Check Also
अझीम प्रेमजींच्या जीवनप्रवासातून काय शिकावे?
भारतीय उद्योगविश्वात आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणारे अझीम प्रेमजी हे यशस्वी उद्योजक आणि तत्वनिष्ठ …
पांचजन्य वृत्तपत्र