निरोगी आणि तेजस्वी त्वचा मिळवण्यासाठी आपण स्क्रबिंग, साबण, लोशन आणि विविध प्रकारची उत्पादनं वापरत असतो. पण त्वचा म्हणजे केवळ एक आवरण नाही, तर ती एक सजीव यंत्रणा आहे आणि तिच्यावर जिवाणूंचे (बॅक्टेरिया) एक स्वतंत्र जग वसलेले आहे. आपल्या आतड्यांत असतात असे सूक्ष्म जीव असतात, तसेच ते त्वचेवरही असतात. हे मायक्रोबायोम (सूक्ष्मजीवजगत) त्वचेचे नैसर्गिक रक्षण करते. यामध्ये बरेच ’गुड बॅक्टेरिया’ असतात आणि ते आरोग्यदायी त्वचेसाठी उपयुक्त भूमिका बजावतात.
त्वचेच्या मायक्रोबायोममध्ये विविध प्रकारचे जीवाणू, बुरशी आणि विषाणू यांचा समावेश असतो. ते त्वचेवर एका विशिष्ट पद्धतीने राहतात. हे सूक्ष्मजीव त्वचेला हानिकारक घटकांपासून संरक्षण देतात आणि त्वचेला आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. विशेषतः त्वचेच्या नैसर्गिक आम्लीय स्तराचे संरक्षण करतात. त्यांना ‘गुड बॅक्टेरिया’ असे म्हटले जाते. हे चांगले जीवाणू त्वचेला नैसर्गिक रितीने हायड्रेटेड ठेवतात.
गुड बॅक्टेरियांसाठी हानिकारक काय?
©अँटीबायोटिक वापर केल्याने बरेच वेळा हे जीव मरतात.
©खूप प्रमाणात सॅनिटायझर किंवा साबण वापरणे
©अतीशय स्वच्छता आणि तीव्र स्क्रबिंग
©उष्ण हवामान किंवा घामामुळेही हा जीवसंच कमी होतो.
©त्वचेच्या मायक्रोबायोमसाठी अन्न आणि व्हिटॅमिन्सचीही गरज असते. यासाठी नैसर्गिक तेल, प्रोबायोटिक फूड, फळं, भाज्या आणि फायबर्स महत्त्वाचे ठरतात.
मायक्रोबायोमची काळजी कशी घ्यावी?
©चेहऱ्यावर किंवा शरीरावर सौम्य साबण किंवा क्लींझर वापरा.
©आंघोळीच्या वेळी किंवा त्वचेवर मॉइश्चरायझर लावताना बॅक्टेरिया नष्ट करणार नाहीत, अशा उत्पादनांचा वापर करा. ते त्वचेला नैसर्गिकरित्या पोषण देतात.
©वारंवार स्क्रबिंगमुळे त्वचेवरील नैसर्गिक इम्युनिटी कमी होऊ शकते, त्यामुळे ती जास्त संवेदनशील होते.
©सनस्क्रीन, छत्री, टोपी इत्यादींचा वापर करून हानिकारक किरणांपासून त्वचेचा बचाव करता येतो.
©दही, लोणी, ताक यामध्ये फायदेशीर प्रोबायोटिक असतात. त्यांचे सेवन केल्याने त्वचेच्या मायक्रोबायोमला पोषण मिळते.
© नियमित व्यायाम आणि निद्रा शरीरातील सूक्ष्मजीवांचे संतुलन राखण्यात मदत करतात.
Check Also
नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचा राजमार्ग
मानवी जीवनात चढ-उतार हे येतच असतात आणि अशा वेळी मनाची शांतता भंग पावून नकारात्मक विचारांचे …
पांचजन्य वृत्तपत्र