अनेकदा असं होतं की आपल्या कपाटात कपडे भरलेले असतात, पण ऐनवेळी काय घालावं हेच समजत नाही. तुमचंही असंच होत असेल, तर कपाट आवरण्याची वेळ आली आहे असे समजावे. नव्या कपड्यांची खरेदी करण्याऐवजी, आधी जे आहेत ते व्यवस्थित लावल्यास मनालाही शांती लाभेल. वॉर्डरोब मॅनेजमेंट हा आजच्या तरुणींचा आवडता छंद ठरला आहे. पण यासाठीचा मुहुर्त उजाडण्यासच मुळी वेळ लागतो. असो, पण जेव्हा कपाट आवरायला घ्याल, तेव्हा सर्वात आधी, आपल्या कपड्यांचे प्रकारनिहाय गट करा. साड्या, कुर्त्या, टॉप्स, ड्रेस, जीन्स इत्यादी. त्यानंतर, प्रत्येक गटात रंगानुसार कपडे मांडून ठेवा. अशा रीतीने विभागणी करुन कपाटामध्ये कपडे ठेवल्यास ते आकर्षक तर दिसेलच, पण कोणता कपडा कुठे आहे हे पटकन सापडेल.
मल्टी-लेयर हँगर, लटकणारे ऑर्गनायझर आणि शेल्फ डिव्हायडर्स वापरून कपाटात अधिक वस्तू व्यवस्थित ठेवता येतात. इनरवेअर, मोजे, स्कार्फ किंवा दुपट्टे हे पारदर्शक बिनतळाच्या डब्यांमध्ये ठेवता येतील. दारांच्या आतील बाजूस हुक्स लावून बेल्ट्स, बॅग्सही सहज टांगता येतील.
कपड्यांबाबत एक साधं तत्त्व अवलंबा. नवीन कपडा आला की एक जुना कपडा देऊन टाका किंवा बाजूला ठेवा. यामुळे कपाटात अडगळ होत नाही आणि फक्त गरजेचे व प्रिय कपडेच ठेवता येतात.
दररोज ऑफिसला जाण्यासाठी, मुलांची शाळा, मार्केट या साठीचे रोजचे कपडे एकाच ठिकाणी ठेवा. हे कपडे सहजपणे उपलब्ध राहतील अशा जागेवर ठेवा. म्हणजेच मधल्या शेल्फवर किंवा सहज काढता येतील अशा हँगरवर. यामुळे सकाळच्या घाईगडबडीत वेळही वाचेल आणि गोंधळही होणार नाही.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र