वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे वार्षिक बैठकीत पहिल्याच दिवशी तब्बल 14 लाख 50 हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. या गुंतवणुकीसोबतच राज्यात 15 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
तत्पूर्वी, दावोस मधील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भविष्याचे वेध घेण्यासाठी सज्ज, विश्वासार्ह आणि दीर्घकाळचा भागीदार म्हणून महाराष्ट्र स्वागत करीत आहे. भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्र जगाला, उद्योग विश्वाला साद घालत आहे, असा मनोदय भावनाही त्यांनी व्यक्त केली. सामंजस्य करारांवरील स्वाक्षरी व करारांच्या आदान-प्रदान प्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रावरील उद्योग क्षेत्राचा, गुंतवणुकदारांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. येथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीबाबत वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत आणि दर्जदार पद्धतीने मिळाव्यात याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सामंजस्य करार पुढीलप्रमाणे आहेत (1) महाराष्ट्र सरकार-काल्सबर्ग, क्षेत्र: अन्न प्रक्रिया आणि कृषी, गुंतवणूक: 500 कोटी, रोजगार : 750 (2) महाराष्ट्र सरकार- योकी ग्रीन एनर्जी प्रा. लि., क्षेत्र: नविनिकरणीय ऊर्जा, गुंतवणूक: 4 हजार कोटी, रोजगार : 6 हजार (3) महाराष्ट्र सरकार-बीएफएन फॉर्जिंग्स, क्षेत्र: स्टील, गुंतवणूक: 565 कोटी, रोजगार : 847, ठिकाण: पालघर/एमएमआर (4) एमएमआरडीए-सुमिटोमो रियालिटी, गुंतवणूक: सुमारे 8 बिलियन डॉलर्स, रोजगार : 80 हजार (5) एमएमआरडीए-के. रहेजा, गुंतवणूक: सुमारे 10 बिलियन डॉलर्स, रोजगार : एक लाख (6) एमएमआरडीए-अल्टा कॅपिटल/पंचशील, गुंतवणूक: सुमारे 25 बिलियन डॉलर्स, रोजगार : 2 लाख 50 हजार (7) एमएमआरडीए-एसबीजी समूह, क्षेत्र: लॉजिस्टिक्स, गुंतवणूक: सुमारे 20 बिलियन डॉलर्स, रोजगार : 4 लाख 50 हजार (8) एमएमआरडीए -आयआयएसएम ग्लोबल, गुंतवणूक: सुमारे 8 बिलियन डॉलर्स, रोजगार : 80 हजार (9) एमएमआरडीए-जायका, धोरण आणि स्ट्रॅटेजी पार्टनर (10) एमएमआरडीए-सेम्बकॉर्प डेवलपमेंट लि. सिंगापूर, एकीकृत इंडस्ट्रियल पार्कसाठी नॉलेज पार्टनर (11) एमएमआरडीए-टेक्निकल युनिव्हर्सिटी, मुनीच, जर्मनी, शाश्वत नागरी वाहतूक प्रणाली, (12) महाराष्ट्र सरकार-सुरजागड इस्पात, क्षेत्र: स्टील, गुंतवणूक: 20 हजार कोटी, रोजगार: 8 हजार,ठिकाण: गडचिरोली (13) महाराष्ट्र सरकार-लोढा डेव्हलपर्स, क्षेत्र: आयटी, डेटा सेंटर्स, गुंतवणूक: 1 लाख कोटी, रोजगार: 1 लाख 50 हजार.
ज्यांनी महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणि विस्तार करण्याची तयारी दर्शवली असे: कोकाकोला, आयकिया, स्कोडा ऑटो. याशिवाय, कार्लसबर्गचे सीईओ जेकब अँडरसन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीला पोषक वातावरणाचे कौतुक करताना राज्याच्या उद्योग धोरणाला दाद दिली. कंपनी लवकरच भांडवली बाजारात आयपीओ आणण्यासाठी प्ऱयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोका-कोला कंपनीचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट मायकेल गोल्टझमन यांच्या समेवत देखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गुंतवणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली.
दावोस मधील पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दर्शवणे सुरु केले. यातून गुंतवणुकीचा मोठा ओघ सुरु झाल्याने महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये उत्साहाचे चित्र निर्माण झाले. हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद निर्मिती, आयटी-आयटीईस, डाटा सेंटर्सह ईव्ही- ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डिजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रातील ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात पोहोचणार असल्याने, तेथे उद्योग वाढीसह मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष या गुंतवणूक आणि उद्योग सुलभतेला प्रोत्साहन देणाऱ्या समर्पित संस्थात्मक व्यवस्थेमुळे यंदा गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्राचा महाराष्ट्राकडील ओघ आणखी वाढला आहे.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र