नवी दिल्लीतील गजबजलेल्या कनॉट प्लेस परिसरातील एक अत्यंत साधा पण मनाला भिडणारा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून, त्याने स्वाभिमानाने जगण्याचा एक मोठा धडा समाजासमोर ठेवला आहे. ’इन्स्टाग्राम’वर जय प्रसाद नावाच्या वापरकर्त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभी राहून माचिसचे बॉक्स विकताना दिसत आहे. विशेष म्हणजे, अत्यंत गरिबीत असूनही ही व्यक्ती कोणासमोरही हात न पसरता किंवा भीक न मागता कष्टाने आपली उपजीविका करत आहे. कनॉट प्लेससारख्या धावपळीच्या आणि कोलाहलाच्या ठिकाणी अत्यंत संयमाने उभे राहून, स्वकष्टाने दोन पैसे कमावण्याच्या त्यांच्या या जिद्दीने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या व्हिडिओमध्ये अनेक वाटसरू त्या वृद्धाकडून आत्मीयतेने माचिस खरेदी करताना दिसत असून, प्रामाणिकपणा आणि आत्मसन्मानाचे हे दर्शन पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. कठीण परिस्थितीतही लाचारी न पत्करता श्र्माला महत्त्व देणाऱ्या या व्यक्तीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा ही दानावर अवलंबून नसून ती कष्ट करून मिळवलेल्या घामाच्या कमाईत असते, याची जाणीव या निमित्ताने सर्वांना झाली आहे.
हा व्हिडिओ केवळ एका व्यक्तीच्या संघर्षाची कहाणी नसून, तो स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणारा एक शक्तिशाली संदेश ठरला आहे. समाजमाध्यमांवरील हजारो लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, समाजात अशा कष्टकऱ्यांचा आदर होणे गरजेचे असून, मदतीपेक्षा त्यांच्या कामाला दिलेली पावती अधिक मोलाची आहे.
Check Also
जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी
तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …
पांचजन्य वृत्तपत्र