लेख-समिक्षण

‌‘एआय‌’ मुळे विचारक्षमतेवर परिणाम

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरणाऱ्या व्यक्तींच्या टीकात्मक विचारक्षमतेवर परिणाम होत असून, त्यामुळे त्या अधिक अविचारी बनत असल्याचा इशारा एका नव्या संशोधनातून देण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्ट आणि कार्नेजी मेलॉन विद्यापीठाच्या संयुक्त संशोधनात असे आढळून आले की, जे वापरकर्तेएआयच्या अचूकतेवर जास्त विश्वास ठेवतात, ते त्या साधनांच्या निष्कर्षांचा कमी विचार करतात. हे संशोधन व्यवसाय, शिक्षण, कला, प्रशासन आणि संगणक क्षेत्रातील 319 व्यावसायिकांवर आधारित आहे.
संशोधन अहवालात म्हटले आहे, “तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर मेंदूच्या क्षमतांमध्ये हळूहळू घट आणतो. यंत्रणांवर अधिक अवलंबून राहिल्यास, वापरकर्त्यांच्या निर्णयक्षमता आणि विचारशक्तीचा सराव होत नाही आणि आवश्यक क्षणी ती कुचकामी ठरू शकते.” या अभ्यासात सहभागी झालेल्या व्यावसायिकांना (ज्यांना त्यांच्या ज्ञानाच्या आधारे मूल्यनिर्मिती केली जाते) एआय वापराचे तीन उदाहरणे देण्यास सांगितले गेले. यामध्ये चॅट जीपीटीसारख्या जनरेटिव्ह एआय टूल्सचा समावेश होता. त्यानंतर त्यांना विचारले गेले की, त्यांनी या कामात टीकात्मक विचार केला का आणि केल्यास कसा? तसेच, एआयशिवाय हे काम पूर्ण करायला किती मेहनत लागली असती आणि त्यांनी केलेल्या कामावरील विश्वासाबाबतही प्रश्न विचारण्यात आले.
संशोधकांचे म्हणणे आहे की, “स्वयंचलनाची एक मोठी विडंबनात्मक बाब म्हणजे यंत्रणा नियमित कामे पार पाडतात, आणि अपवादात्मक निर्णय वापरकर्त्यांवर सोपवतात. त्यामुळे वापरकत्र्यांना नियमितपणे निर्णय घेण्याचा सराव होत नाही, आणि अपवादात्मक परिस्थितीत ते तयार नसतात.” या संशोधनाचे निष्कर्ष या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या उकख उेपषशीशपलश ेप र्कीारप ऋरलेीीीं ळप उेार्ीीिंळपस डूीींशाी मध्ये सादर करण्यात येणार आहेत. सध्या हे संशोधन मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले असून, त्यावर अद्याप सहकर्मी पुनरावलोकन ( शिशी- ीर्शींळशु) झालेले नाही.

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …