तुम्ही नव्या नोकरीच्या शोधात असाल तर ॲप्लीकेशन करताना घडणाऱ्या या कॉमन चुका सहज टाळता येण्यासारख्या आहेत. या चूकांमुळे तुमची नवी नोकरी मिळण्याची संधी धुसर होऊ शकते किंवा आहे त्या जॉबपासून हात धुवावा लागतो. तुम्ही नोकरी शोधत आहात हे तुमच्या ऑफिसमधल्या कोणालाही( कितीही बेस्ट फ्रेंड असला तरी) सांगू नका.तुमच्या बॉसला तुम्ही नोकरी सोडत असल्याची कुणकुण लागली तर त्याचा परिणाम तुमच्याशी असलेल्या वागणूकीत नक्कीच होईल. तुमच्यावर विश्वास दाखवला जाणार नाही आणि तुमच्यावर शेरेबाजी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मुख्य म्हणजे नोकरी सोडतानाही नव्या कंपनीत कुठे जॉइन होत आहात हे गुलदस्त्यातच राहू द्या. कारण तुम्ही तिथे जॉईन झाल्याशिवाय त्याची बातमी इतरांना लागू देणे तुमच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकते. आजकालच्या कॉम्पीटिशनच्या युगात हे पथ्यं फार पाळावे लागते.
नव्या नोकरीसाठी ॲप्लाय करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या. नव्या नोकरीसाठीचा अर्ज नीट शांतपणे वाचा. त्यात नक्की कोणत्या गोष्टींची पूर्तता करायला सांगितली आहे याची यादी करा. त्याला आपण चेकलिस्ट म्हणू शकतो. कोणती डिक्लरेशन द्यायची आहेत? कोणती कागदपत्रे जोडायची आहेत? याची नीट छाननी करा. अर्ज व्यवस्थित आणि पूर्ण भरा. काहीवेळा पगाराबद्दलची अपेक्षा किंवा राहण्याचं ठिकाण याची माहिती मुद्दामहून भरली जात नाही. या गोष्टी प्रत्यक्ष मुलाखतीत ठरवल्या जातील अशी अपेक्षा अ्रसते.
आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यात दिलेल्या सूचनांंचं पालन करणं. उदा. त्यात जर ‘टेलिफोनवरून संपर्क साधू नये’ अशा सूचना असतील तर तिथल्या रिशेप्शनला किंवा एचआरला वारंवार फोन करून नोकरीबद्दल चौकशी करणं टाळा. तुमचा नंबर त्यात लिहीलेला असतो त्यानुसार ते तुम्हाला संपर्क साधतील. त्यासाठी थोडा धीर धरावा लागेल. फार तर तुम्ही एखादा इमेल करून संबंधित व्यक्तीला आठवण करून देऊ शकता.
भरलेला फॉर्म पूर्ण चेक करा. त्यात स्पेलिंग किंवा व्याकरणाच्या चूका नाहीत ना, तुमची माहिती योग्य पध्दतीने दिली गेली आहे ना, केवळ करत असलेल्या कामांचा उल्लेेख न करता तुम्ही मिळवलेल्या विशेष प्राविण्याची योग्य माहिती दिली आहे का? तुमची माहिती केवळ पानं भरण्यासाठी तर झालेली नाही ना? तुमचे शिक्षणाविषयीचे डिटेल्स पूर्ण रकान्यात योग्यप्रकारे भरले आहेत ना? ॲप्लीकेशनला एक कव्हर लेटर जोडलं आहे ना? तुमचे संपर्काचे नंबर अणि इमेल ॲड्रेस व्यवस्थित आहेत ना ?अशा अनेक गेोष्टी त्यात पहायच्या असतात. घाईगडबडीत त्यातील काही राहून गेले नाही ना याची खात्री करा. तुमचं ॲप्लीकेशन खूप सजवू नका. काहीजण वेगवेगळे फाँट वापरून, आपल्या अनावश्यक माहितीला खूप महत्व देऊन त्याची जाहिरात केल्यासारखा अर्ज करतात. त्यातून कंपनीच्या उपयोगाचं काहीच हाती लागत नाही. त्यामुळे मुद्देसूद माहिती लिहीणं आणि ती योग्य प्रकारे सादर करणं यावर भर द्या.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र