चेहऱ्यावर नैसर्गिक चमक असावी अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. बाजारात मिळणाऱ्या विविध क्रीम्स आणि ब्युटी प्रॉडक्टस अनेक मोठमोठे दावे करतात, पण अनेकदा असे दिसून येते की, घरात सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींचा परिणाम जास्त चांगला आणि सुरक्षित असतो. यामध्ये सर्वांत पहिल्या स्थानावर आहे ती हळद. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल (जंतुनाशक), अँटी-ऑक्सिडंट (ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणारे) आणि अँटी-इंफ्लेमेटरी (दाह कमी करणारे) गुणधर्म असतात. यामुळे त्वचेवरील अनेक समस्या दूर होऊ शकतात:
हळदीमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, फोड आणि काळे डाग कमी होण्यास मदत होते. हळद त्वचेमधील अशुद्धता बाहेर टाकते. त्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते. हळदीचा नियमित वापर केल्यास त्वचेला नैसर्गिक चमक येते. योग्य प्रमाणात वापरल्यास हळदीचा वापर कोरडी, ऑइलयुक्त किंवा मिश्र् त्वचेसाठीही करता येतो. हळदीचा फेसपॅक घरी बनवणे खूप सोपे आहे. साहित्य: अर्धा चमचा हळद, 1 चमचा बेसन (हरभऱ्याचे पीठ), गुलाबपाणी किंवा 1 चमचा दही.
कृती : सर्व साहित्य एकत्र करून मऊसर पेस्ट बनवा. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावा (डोळे व ओठ सोडून). 10-15 मिनिटे कोरडी होईपर्यंत राहू द्या. त्यानंतर कोमट किंवा थंड पाण्याने हलक्या हाताने चोळत चेहरा स्वच्छ धुवा. तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल तर हळदीचे प्रमाण कमी ठेवा आणि आधी हाताच्या त्वचेवर पॅच टेस्ट करा. हा फेसपॅक आठवड्यातून 2 वेळा लावल्यास उत्तम परिणाम दिसून येतील.
हेही लक्षात ठेवा
रहलद कधीही थेटपणाने वापरू नका. ती नेहमी गुलाबपाणी, दही, बेसन किंवा इतर काही बेसन यांबरोबरीनेच वापरा.
रहळद लावल्यावर लगेच उन्हात जाऊ नका. यामुळे त्वचेची जळजळ होणे, काळे डाग पडणे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. रबाजारात अनेकदा भेसळयुक्त हळद मिळते. ती त्वचेस हानिकारक ठरू शकते. शक्य असल्यास घरगुती सेंद्रिय हळद वापरावी. सीरम लावल्याचे परिणाम झटकन दिसत नाहीत. तुम्हाला ते नियमित आणि योग्य पद्धतीने वापरावे लागते. सामान्यतः 3-6 आठवड्यांमध्ये परिणाम दिसू लागतात.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र