आता मोबाइलमध्येच फोटो काढता येत असल्यानं प्रत्येक जण फेोटोग्राफर झालाय. त्यातही स्मार्टफोन हातात आल्यानं तर जणू आपले दोन हात आभाळालाच टेकलेत की काय, अशी अवस्था झालीय. आपण बाहेर असो वा घरात… फेोटो काढण्याचा मोह आपल्याला होतोच आणि त्यात गैरही काहीच नाही. पण अनेकदा चांगला फोटो काढण्याची आपली संधी हुकते. काय चुकतं आपलं?… काय करता येईल?
आपल्याला जे जे दिसतं, ते ते सगळं कॅमेऱ्यात टिपता यावं असं आपल्याला वाटतं. पण ते तसंच जमतं असं नाही. त्याची एक कला आहे. अर्थात आपण प्रोफेशनली फोटोग्राफर होणार नसलो, तरी काही गोष्टी शिकून चांगला फोटो तर नक्कीच काढता येईल, नाही का?
ग्न दृष्टी असायला हवी ः मुळात तुम्हाला चांगलं दृश्य टिपण्याची दृष्टीच असायला हवी. घेतला हातात मोबाइल किंवा कॅमेरा आणि लावला डोळ्यांना… तर तसं होत नाही. तुम्हाला समोर जे दिसतंय त्यात मन ओतता आलं पाहिजे. त्यातला योग्य अँगल निवडता आला पाहिजे. त्यातून आपण काय दाखवणार आहोत, याचा विचार करायला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे तिथं स्वच्छ सूर्यप्रकाश असला पाहिजे.
ग्न खर्चिक कॅमेऱ्याची गरज नाही ः फोटोग्राफी शिकण्यासाठी तुम्हाला महागड्या कॅमेऱ्याची गरज नाही. साध्या डिजीटल कॅमेऱ्यानेही तुम्ही ही कला शिकू शकता. त्यासाठी सराव मात्र गरजेचा आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या शेड्समध्ये काढलेल्या फोटोंचा अभ्यास करा. त्यातूनच काय चुकलं हे तुमच्या लक्षात येईल आणि भविष्यात कोणताही फोटो काढताना तुम्ही ती चूक परत करणार नाही.
ग्न साठा करायला शिका : तुम्ही काढलेल्या फोटोंचा साठा करायला शिका. त्यातले वेगवेगळ्या विषयांचे वर्गीकरण करा. वेळ असेल, तेव्हा ते पाहात जा. त्यातूनच तुमच्यात झालेला बदल तुमच्या लक्षात येत जाईल. कॅमेऱ्यात सर्वच फोटो राहणार नाहीत, त्यासाठी तुमच्या कॉम्प्युटर-लॅपटॉपमध्ये बॅकअप देऊन ठेवा.
ग्न फोटो शेअर करा : तुम्ही काढलेले फोटो इतरांना शेअर करायला शिका. कारण इतरांनी पाहिल्यावर त्यातून त्यांच्या कॉमेन्टद्वारे चांगल्या-वाईट गोष्टी तुमच्या कानावर पडतील. अर्थातच चांगल्या फोटोंचं कौतुकच होईल आणि तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. फोटो शेअर करण्यासाठी काही ऑनलाइन साईट्सही आहेत. त्यावरही अपलोड करून तुम्ही इतरांना पाठवू शकता. त्यातून आर्थिक फायदाही शक्य आहे.
ग्न सतत तयार राहा, गुणवत्तेचा ध्यास धरा : मला आता चांगले फोटो काढता येतात, या भ्रमात राहू नका. सतत नव्या अँगलने, सतत नव्या नजरेने प्रत्येक घटनेकडे, दृश्याकडे पाहायला शिका. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे नेहमी तयार राहा. आळस करू नका. तुमचा कॅमेरा, त्याची बॅटरी, तुमचा उत्साह नेहमीच दांडगा असला पाहिजे.
ग्न या साऱ्या गोष्टी असतील, तर तुम्हाला चांगला फोटोग्राफर बनण्यापासून कोण थांबवील?
Check Also
लहान मुले आणि व्हिडिओ कॉलिंग
लहान मुलांच्या निरागस हालचाली सर्वांनाच मोहवून टाकतात. अनेकदा दूर राहणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी बाळाला पाहण्यासाठी …
पांचजन्य वृत्तपत्र