लेख-समिक्षण

इंडक्शन कूकर वापरताय?

इंडक्शन कूकर हे उपकरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन तंत्रावर कार्य करते. त्यात गरम होणारी हॉट प्लेट स्वतः तापत नाही, तर त्यावर ठेवलेल्या लोहयुक्त भांड्यांना गरम करतो. यामुळे ऊर्जा थेट अन्नात वापरली जाते आणि हीट लॉस कमी होतो.
फायदे काय आहेत?
• पारंपरिक गॅसच्या तुलनेत हीटिंग प्रोसेस जलद होते. कारण यामध्ये उर्जा वाया जात नाही.
• उघडी ज्योत नसल्यामुळे जळण्याचा धोका कमी.
• उष्णता फक्त भांड्यालाच लागत असल्याने प्लेट स्वच्छ ठेवणं सोपे ठरते. ?चूक तापमान व वेळ सेट करता येत असल्याने स्वयंपाकाला शिस्तीचे कोंदण लाभते. वापरासंबंधीच्या टिप्स
• इंडक्शन कूकरवर फक्त लोखंड, स्टील किंवा खास इंडक्शनसाठी डिझाइन केलेली भांडी वापरावीत. अ‍ॅल्युमिनियम, काच किंवा तांब्याची भांडी चालत नाहीत.
• भांडे प्लेटवर संपूर्ण व सपाट ठेवलेले असावे, अन्यथा उष्णता नीट पोहोचत नाही व कूकिंग वेळ वाढतो.
• अनेक इंडक्शन कूकरमध्ये ऑटो ऑफ फंक्शन असते. स्वयंपाक पूर्ण झाल्यावर ते आपोआप बंद होते — याचा फायदा घ्या.
• वापरानंतर कूकर थंड झाल्यावर ओल्या कापडाने त्याला पुसा. प्लेटवर अन्नाचे थेंब राहिले तर ते पुढच्या वेळी गरम होऊन जळू शकतात.
• प्लेटवर खूप जड भांडी ठेवू नका. यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
• इंडक्शनसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिकल सॉकेट वापरणे चांगले. ओव्हरलोडिंग टाळण्यासाठी हे आवश्यक आहे.
वीजबचतीसाठी
• भांडे झाकण लावून वापरा
• मध्यम तापमानावर स्वयंपाक करा
• टाइमर सेट करून ‘ओव्हर कूकिंग’ टाळा काय करु नये?
• लास्टिकच्या किंवा तळाला कोटिंग असलेल्या भांड्यांचा वापर करू नका.
• कोरडं भांडं रिकामं गरम करू नका. यामुळे प्लेट खराब होण्याचा धोका असतो.
• कूकरवर पाणी किंवा तेल सांडू देऊ नका. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक सर्किट डॅमेज होऊ शकते.

Check Also

लहान मुले आणि व्हिडिओ कॉलिंग

लहान मुलांच्या निरागस हालचाली सर्वांनाच मोहवून टाकतात. अनेकदा दूर राहणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी बाळाला पाहण्यासाठी …