तरुणी असोत वा महिला, कॉलेजगोईंग असोत वा प्रोफेशनल, कुर्ती ही आजच्या काळातली सर्वांत लोकप्रिय फॅशन आहे. उन्हाळ्यामध्ये तर कुर्तीचा पेहराव आरामदायी, स्टायलिश आणि हटके लूक देणारा ठरतो. सामान्यतः महिला सलवार कमीज घालणं पसंत करतात, पण हटके आणि स्टायलिश लूकसाठी कुर्ती विविध प्रकारे टीमअप करून घालता येते.
सलवार कमीज विथ ट्विस्टकुर्ता आणि पटियाला सलवार हा कॉम्बो मुलींवर फारच सुंदर दिसतो. यामध्ये थोडासा स्टाइलचा तडका द्यायचा असेल, तर कुर्तीवर छोटे कॉन्ट्रास्ट रंगाचे शॉर्ट जॅकेट घालू शकता. हे जॅकेट एक वेगळाच फ्रेशनेस आणतं.
कुर्ती विथ जीन्स ः कॉलेज गोईंग गर्ल्स किंवा ऑफिसमध्ये कूल आणि स्टायलिश लुक हवा असल्यास, फ्रंट स्लिट लाँग कुर्ती रिप्ड किंवा प्लेन जीन्ससोबत घालणं एकदम बेस्ट! उन्हाळ्यासाठी फ्लोरल प्रिंट असलेली कुर्ती हा एक सुंदर पर्याय आहे.
कुर्ती विथ स्कर्ट ः जर तुम्ही पार्टीसाठी एखादी कुर्ती खरेदी करत असाल तर ती एखाद्या फ्लेयर्ड लाँग स्कर्टसोबत घालणं खूपच रॉयल दिसतं. सध्या मार्केटमध्ये विविध रंग व डिझाइन्समध्ये पार्टीवेअर कुर्ती सहज मिळतात. तुम्ही कुर्तीशी मॅच होणारा स्कर्ट निवडू शकता. समर पार्टीसाठी हा लुक सर्व वयोगटातील मुलींवर खुलून दिसतो.
कुर्ती विथ धोती पँट्स ः धोती पँट्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. तुम्हीही तुमच्या कुर्तीला प्लीट्स असलेल्या स्टायलिश धोती पँट्ससोबत कॅरी करू शकता. हा लुक पारंपरिक असूनही खूप मॉडर्न फील देतो. काहीतरी वेगळं ट्राय करू इच्छित असाल तर हा पर्याय नक्कीच तुमच्यासाठी आहे.
कुर्ती विथ पलाझो ः नेहमीच कुर्ती लेगिंग्स किंवा सलवारसोबत कॅरी केली जाते, पण नविन स्टाइलिंग करायचं असेल तर पलाझोसोबत कुर्ती हा उत्तम पर्याय आहे. ऑफिससाठी हा लुक एकदम योग्य आहे. सलग आठ तासांच्या कामानंतर टाइट लेगिंग्समध्ये होणारी अस्वस्थता टाळण्यासाठी पलाझो एकदम आरामदायक असतो. प्लेन पलाझोसोबत सिंपल कुर्ती घातली तरी तुम्ही खूप एलिगंट आणि स्टायलिश दिसू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांत पलाझो अधिक आरामदायी फील देतात.
तुमच्याकडे लाँग फ्लोअर लेंथ कुर्ती किंवा अनारकली स्टाइल कुर्ती असेल तर ती गाउन किंवा मिड लेंथ ड्रेससारखीही घालू शकता. अशा ड्रेससाठी बॉटम्सची गरज भासत नाही. पार्टीत हा लुक कॅरी करत असाल तर हाय हिल्स घालायला विसरू नका. —
१४. घरकूल- युथफुल
चटकदार मेयोनीज वापरताय?
बर्गर, मोमोज आणि सँडविचमध्ये लावले जाणारे मेयोनीज हा मुलाबाळांसह हल्ली सर्वांच्याच आवडीचा अन्नघटक म्हणून पुढे आला आहे. अर्थातच, पाश्चिमात्य देशांमधून आलेल्या फास्टफूड-जंकफूड कल्चरमधून याची चटक सर्वदूर वाढत चालली आहे. पण ते आरोग्यासाठी घातक असल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता तर तमिळनाडू सरकारने ८ एप्रिल २०२५ पासून पुढील एक वर्षासाठी अंड्यापासून बनवलेल्या मेयोनीजवर बंदी घातली आहे. मेयोनीज हे मोठ्या प्रमाणावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. ते एक जाडसर व मलईदार चविष्ट सॉस आहे. साधारणपणे अंड्याचा बलक, तेल, व्हिनेगर आणि मसाले यांच्या मिश्रणाने ते तयार केले जाते. बर्गर, सँडविच, मोमोज यांमध्ये मेयोनीजचा वापर हल्ली सर्रास केला जातो. मात्र तमिळनाडू सरकारच्या निरीक्षणानुसार, कच्च्या अंड्यांपासून बनवलेल्या मेयोनीजमध्ये योग्य स्वच्छता व साठवण न केल्यामुळे धोकादायक जंतू वाढत जातात. त्यामुळे अन्नसुरक्षा व मानक अधिनियम २००६ च्या कलम ३०(२)(अ) अंतर्गत ही बंदी घातली असून ती पुढील एक वर्षासाठी लागू असेल.
फूड पॉइजनिंगचा धोका
मागील काळात आलेल्या काही अहवालांनुसार, अंड्यापासून बनवलेल्या मेयोनीजमध्ये साल्मोनेला, ई. कोलाई आणि लिस्टीरियासारखे घातक जंतू विकसित होऊ शकतात. जर एखाद्याने दूषित मेयोनीज खाल्ले, तर त्याला पोटदुखी, उलट्या, जुलाब व ताप यांसारख्या त्रासांचा सामना करावा लागू शकतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याची वेळही येऊ शकते. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांसाठी हा धोका जास्त असतो.
मेयोनीज नीट आणि स्वच्छतेचे निकष पाळून बनवले नसेल किंवा योग्य तापमानावर साठवले नसेल तर ते सहज खराब होऊ शकते. खराब झालेले मेयोनीज दिसायला सामान्य वाटते, पण त्यात हानीकारक जंतू असू शकतात. त्यामुळे सध्या तरी मेयोनीज खाताना सावध राहणे गरजेचे आहे. विशेषतः मुलांना ते देताना दक्षता बाळगा. घरगुती मेयोनीज करताना देखील स्वच्छता आणि योग्य साठवण याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.
मेयोनीजला पर्याय यासाठी दही, हंग कर्ड किंवा अॅव्होकाडो बेस्ड डिप्स वापरू शकता. तसेच बाजारातून मेयोनीज विकत घेताना पॅकिंग, एसपायरी डेट आणि ब्रँडची विश्वासार्हता नक्की तपासा. शय असल्यास फक्त दर्जेदार व सुरक्षित प्रोडट्सच वापरा.
Check Also
लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत
लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …
पांचजन्य वृत्तपत्र