लेख-समिक्षण

‘क्रू’ परतणार…

करीना कपूर, क्रिती सॅनॉन आणि तब्बू या हवाई सुंदर्‍यांचा ‘क्रू’ लवकरच परतणार आहे. २०२४ मध्ये या विनोदी अंगाने जाणार्‍या गुन्हेपटाने रसिकांची चांगलीच पसंती मिवली होती.
एकता कपूर आणि रिहा कपूर यांनी ‘क्रू’ चित्रपटाची निर्मिती केली होती. या दोघांनी आता या चित्रपटाचा दुसरा भाग आणायचे ठरवले आहे. ‘क्रू’ या चित्रपटातच त्याचे अनेक भाग लपले आहेत. निर्मात्यांनी अनेक संकल्पांनांची चाचपणी केली. त्यानंतर एका संकल्पनेवर त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. हाच ‘क्रू’च्या दुसर्‍या भागाच्या पटकथेचा गाभा असेल. दुसर्‍या भागात फक्त करीना दिसणार आहे. इतर दोन्ही हवाई सुंदरी बेपत्ता असतील. थोडक्यात त्यांचे बेपत्ता होणे अधिक गडद केले जाणार आहे. करीनाने निर्मिती संस्थेला चित्रपटाच्या पुढील भागासाठी होकार दिला आहे. अद्याप तिने मध्यवर्ती कथानक ऐकले नसल्याचे समजते. सध्या करीना मेघना गुलजारच्या ‘दर्या’ या चित्रपटात काम करत आहे. या शिवाय ‘वीरे दी वेडींग’ या चित्रपटासाठी तिची निर्मात्यांसोबत चर्चा सुरु आहे.- राधिका बिवलकर

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …