लेख-समिक्षण

व्हर्सेटाईल लेगिंग्ज

लेगिंग्ज म्हणजे टाईट फिटिंग असणारा वस्त्रप्रकार. कॅज्युअल आउटफिट म्हणून घालण्यासाठी अतिशय सहज सोपा आणि आरामदायी तसेच दिसायलाही आकर्षक. त्यामुळे महिला वर्गात लेगिंग्जची लोकप्रियता मोठी असल्याचे दिसते. या लेगिंग्ज आपण वेगवेगळ्या प्रकारे घालून पेहरावात वेगळेपण आणू शकतो. ब्लॅक, ब्राउन या नेहमीच्या लेगिंग्जपेक्षा बाजारामध्ये सध्या रंगांची खूपच विविधता दिसून येत आहे. केवळ रंगातच नाही तर स्टेश्चर आणि पॅटनमध्येसुद्धा या भरपूर व्हरायटी दिसून येतात. लेगिंग्जचे हे नवे प्रकार कशा प्रकारे घालायचे हे देखील महत्त्वाचे ठरते.
ब्लॅक रंगाची पोटर्‍यांपर्यंत अर्थात थ्री फोर्थ असणारी लेगिंग्ज लाँग स्वेटरसोबत घातल्यास छान दिसते. त्यावर लाँग कार्डिगन देखील घालता येऊ शकते. अर्थात ते एकाच रंगाचे असावे. असे कार्डिगन ब्लॅक लेगिंग्जबरोबर घालावेत. या आउटफिटवर पेन्सिल हिल्स परफेट फूटवेअर ठरतात.
टॉप डल कलरचा असेल तर त्यावर ब्राईट कलरचे लेगिंग्ज घालणे चांगला पर्याय ठरू शकते. पेल कलरचे टँक टॉप घेणार असाल तर त्यावर ब्राईट कलरच्या लेगिंग्जमुळे कंप्लिट लूक मिळू शकतो.
सध्या शर्ट स्कर्ट विथ लेगिंग्ज ही लोकप्रिय ठरलेली फॅशन आहे. विकएन्डसाठी हे कॅज्युअल आउटफिट आहे. त्यासाठी डेनिमचा किंवा कॉर्ड्युरॉय मिनीस्कर्ट, त्यावर सूट होणार्‍या रंगाची लेगिंग्ज घालता येऊ शकते. यावर फ्लॅट फूटवेअर अधिक आकर्षक दिसतात. त्यामुळे कॅज्युअल लूक येतो. लेगिंग्जवर नेहमी लूज फिटिंगचे टॉप घालावेत, टाईट टॉप घालणे टाळावे. कारण लेगिंग्ज मुळात टाईट फिटिंगच्या असतात त्यामुळे फिटिंगच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी.

Check Also

लहान मुले आणि व्हिडिओ कॉलिंग

लहान मुलांच्या निरागस हालचाली सर्वांनाच मोहवून टाकतात. अनेकदा दूर राहणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी बाळाला पाहण्यासाठी …